२२ जानेवारी रोजी महाराष्ट्रात शाळांना सुटी देण्याची मागणी

 


भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

पुणे : राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी २२ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील शाळांना सुटी जाहीर करावी,अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या उत्तर भारतीय मोर्चाने केली आहे. मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नवीन सिंग यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पात्र लिहून ही मागणी केली आहे. त्याबाबत पुण्यात सिंग यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही या पत्राची प्रत पाठविण्यात आली आहे . 

'भारतीय परंपरेची प्रतिष्ठा वाढविणारा हा सोहळा असून हा ऐतिहासीक सोहळा अनुभवता यावा आणि साजरा करता यावा यासाठी शाळांना सुटी जाहीर करावी',असे नवीन सिंग यांनी या निवेदनात म्हटले आहे. 

२२ जानेवारी रोजी महाराष्ट्रात शाळांना सुटी देण्याची मागणी २२ जानेवारी रोजी महाराष्ट्रात शाळांना सुटी देण्याची मागणी Reviewed by ANN news network on १/१३/२०२४ ०२:३५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".