भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय आयोजित रक्तदान शिबिरात ६७८ जणांचा सहभाग

 


रक्तदानातून डॉ .पतंगराव कदम यांना जयंतीनिमित्त अभिवादन 

पुणे:  भारती अभिमत विद्यापीठचे संस्थापक डॉ.पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त भारती विद्यापीठ  अभियांत्रिकी महाविद्यालय आयोजित रक्तदान शिबिरात ६७८  बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.हे रक्तदान शिबीर १२ जानेवारी रोजी धनकवडी शैक्षणिक संकुलात  पार पडले. रक्तदान शिबिराचे हे ३४ वे वर्ष होते.पुणे ग्रामीण  पोलीस अधीक्षक अंकित गोयल,कुलपती डॉ.शिवाजीराव कदम,'भारती परिवार'चे अध्यक्ष बाबा शिंदे,प्राचार्य डॉ.विदुला सोहोनी,डॉ.राजेश क्षीरसागर,डॉ.मंदार करमरकर,डॉ.ए.सी.मिश्रा,डॉ.सचिन चव्हाण,डॉ.सुनीता जाधव,डॉ.अमोल कदम,प्रा.प्रिया हिरवे,प्रशांत यादव उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना तसेच भारती ब्लड बँक यांनी आयोजनात सहकार्य केले.भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ.विदुला सोहोनी यांनी स्वागत केले.  

उद्घाटन कार्यक्रमात बोलताना अंकित गोयल  म्हणाले 'रक्तदान हे सर्वोच्च मानवी कर्तव्य आहे,वेळोवेळी ते करीत राहिले पाहिजे. सेवा हाच धर्म अशी शिकवण भारतीय संस्कृतीने दिली आहे.ज्ञानदान आणि रक्तदानाने मानवतेला मदत होते. भारती विद्यापीठसारख्या संस्थेत दोन्हीचा संगम होतो आहे,ही आनंदाची बाब आहे.अभियांत्रिकी विद्यार्थ्यांकडे असलेल्या विशेष ज्ञानामुळे ते समाजाची विशेष सेवा करू शकतात आणि रक्तदानासारख्या उपक्रमातून त्यांना समाजाला देण्याची सवय लागते आहे,हेही उल्लेखनीय आहे.'

डॉ.शिवाजीराव कदम यांनी डॉ.पतंगराव कदम यांच्या कर्तृत्व आणि योगदानाला उजाळा दिला.ते म्हणाले,'अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी झगडत डॉ.पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाचा चौफेर विस्तार केला.त्यांच्या दूरदृष्टीमुळे लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दरवाजे खुले झाले'.

प्राचार्य डॉ.विदुला सोहोनी  म्हणाल्या,'स्व.पतंगराव कदम यांनी केवळ पदव्या देण्यासाठी शिक्षण संस्थेचा विस्तार केला नाही,तर त्यांना समाजपरिवर्तन घडवून आणणारे विद्यार्थी घडवायचे होते. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास त्यांनी सदैव घेतला.रक्तदान शिबिरातून या ध्यासाचे स्मरण आम्ही सर्व जण करीत असतो'.

भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय आयोजित रक्तदान शिबिरात ६७८ जणांचा सहभाग भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय आयोजित रक्तदान शिबिरात ६७८ जणांचा सहभाग Reviewed by ANN news network on १/१३/२०२४ ०२:३७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".