विठ्ठल ममताबादे
उरण : जासई व चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील मालाची हाताळणी करणाऱ्या वैष्णो लाँजिस्टीक पार्क या गोदामाला सोमवार दिनांक १५ जानेवारी २०२४ रोजी भीषण आग लागल्याची घटना सकाळी ९-३० च्या सुमारास घडली आहे.गोदामात बेकायदेशीरपणे ठेवण्यात आलेल्या अतिज्वलंशील केमिकलमुळे आग लागल्याचे स्पष्ट होत असून अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आहेत.या आगीत गोदामातील कामगार थोडक्यात बचावले असल्याची माहिती कामगारांकडून प्राप्त होत आहे.
उरण हा ज्वालामुखीच्या तोंडावर वसलेला तालुका असून या तालुक्यात केंद्र व राज्य सरकारचे महत्वाचे प्रकल्प आहेत.त्यात जेएनपीए बंदरावर आधारीत मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाची निर्मिती ही शासकीय नियमांची पायमल्ली करून होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.त्यामुळे अनेक वेळा देशातील तथा परदेशातील मालाची हाताळणी करणाऱ्या सदर गोदामाला आगी लागल्याच्या घटना या वारंवार घडत आहेत.
मागील दोन वर्षांपूर्वी जासई व चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील वैष्णो लाँजिस्टीक पार्क या मालाची व केमिकल ची हाताळणी करणाऱ्या गोदामात स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली होती.या स्फोटात गोदामातील कामगारांना आपले जीव गमवावे लागले होते.यावेळी संबंधित प्रशासनाने गोदाम मालक तसेच संबंधित ठेकेदार यांची पाठराखण करुन सदर प्रकरणावर पांघरूण घालण्यासाठी पुढाकार घेतला होता.
त्याच कामगार व रहिवाशांच्या जीवाशी खेळत असलेल्या वैष्णो लाँजिस्टीक पार्क या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला सोमवारी मकरसंक्रांतीच्या दिवशी सकाळी ९-३० च्या सुमारास पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली.यावेळी कामगारांच्या सावधगिरीमुळे कामगार बालबाल बचावले आहेत.या घटनेची माहिती सिडको, जेएनपीए येथील अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटना स्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आहेत.
एकंदरीत वैष्णो लाँजिस्टीक पार्क या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला वारंवार आग लागल्याची घटना घडत असल्याने जासई चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून गोदाम मालक व संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निळकंठ घरत यांनी केली आहे.
उरण तालुक्यातील जासई तथा चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील वैष्णो लाँजिस्टीक पार्क या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली असून सदर आग कशामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही.तसेच कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झालेली नाही.- डॉ उद्धव कदम, तहसिलदार - उरण
चिर्ले येथील वैष्णो लाँजिस्टीक पार्क गोदामात अग्नितांडव; सुदैवाने जीवितहानी टळली
Reviewed by ANN news network
on
१/१६/२०२४ १२:५८:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१/१६/२०२४ १२:५८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: