विठ्ठल ममताबादे
उरण : पाले गावात स्पार्टन क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय मोहिंदर शामकांत गावंड स्मृती चषक २०२४ स्पर्धा मोठया उत्साहात झाली.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवशंभो पाले व द्वितीय क्रमांक स्पार्टन क्रिकेट क्लबने पटकावला.या सामन्याच्या बक्षीस वितरणप्रसंगी प्रमुख पाहुने म्हणून खोपटे गावातील उद्योगपती देवेंद्र पाटील,उरण तालुका बीजेपी उपाध्यक्ष मुकुंद गावंड,आवरे गावातील युवा नेते धनेश गावंड,चिरनेर पंचायत गण अध्यक्ष प्रशांत ठाकुर,सारडे सरपंच रोशन पाटील,माजी उपसरपंच समाधान म्हात्रे,पाले गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत म्हात्रे,प्रेमनाथ पाटील ,विजय भोसले,सावकार डेवलपर्स मालक लवेश भगत ,पाले गावातील युवा नेते पंकज म्हात्रे,सारडे गावातील युवा कार्यकर्ता अमित म्हात्रे,पाले गावातील पाले गाव अध्यक्ष अमित म्हात्रे,दिनेश म्हात्रे,रोशन म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.मुकुंद गावंड यांनी आपल्या भाषणात खेळाडूंना प्रोत्साहित केले.सूत्रसंचालन सत्यवान म्हात्रे यांनी केले.
स्वर्गीय मोहिंदर गावंड स्मृती चषक २०२४ उत्साहात
Reviewed by ANN news network
on
१/१५/२०२४ ०८:५०:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१/१५/२०२४ ०८:५०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: