शेलघर शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

 



विठ्ठल ममताबादे

उरण :  शेलघर, तालुका पनवेल येथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते दिपक  ठाकूर, यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा शेलघर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रघुनाथ घरत, अतुल भगत, सुधीर घरत, सचिन घरत, प्रकाश भगत, रमेश घरत, अजय भगत,मधुकर पाटील,निशिकांत सुतार,संतोष भगत, कुणाल घरत, डि. पी. सोनावणे, मनमोहन महाराज, श्री. लिंबाजी, राजू ठाकूर, प्रफुल्ल घरत, प्रल्हाद भगत आदी मान्यवर उपस्थित होते.

ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देउन त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. शाळेचे शिक्षक अशोक पाटील व सर्व शिक्षकांनी सर्वांचे स्वागत केले. 
आभार प्रदर्शन उपसरपंच सचिन घरत यांनी केले. व कार्यक्रमाची सांगता झाली.

शेलघर शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप शेलघर शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप Reviewed by ANN news network on १/१५/२०२४ ०८:५७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".