विठ्ठल ममताबादे
उरण : उरण रोटरी एज्युकेशन सोसायटीच्या रोटरी इंग्लिश मिडियम हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज चा ३४ वा वार्षिक स्नेह संमेलन भव्य सोहळा मोठया उत्साहात रोटरी एज्युकेशन सोसायटीची रोटरी इंग्लिश मिडियम हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या मैदानावर बोरी उरण येथे पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ग्लोबल ऑऊट सोरसींग कंट्रोल्स लिड चे व ग्लोबल सिनिअर वाईस प्रेसिडंट, सिटी ग्रुपचे प्रसाद एस प्रधान उपस्थित होते. तसेच सन्माननीय अतिथी म्हणुन कॅप जेमिनी च्या वाईस प्रेसीडंट चित्रा एस दाते उपस्थीत होत्या.
कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे सचिव यतिन म्हात्रे व शाळेच्या प्रशासकीय अधिकारी पुष्पा कुरूप यांनी केली .मनिषा महाजन यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. संस्थेचे अध्यक्ष विकास महाजन यांनी प्रमुख पाहुणे प्रसाद एस प्रधान यांचे पुष्प गुच्छ, शाल व श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार केले. तसेच पुजा म्हात्रे सदस्या यांनी सन्माननीय अतिथी यांचे परिचय प्रस्तावना केली व चित्रा एस दाते यांचे शाळेच्या प्राचार्य अक्षता घरत यांनी पुष्प गुच्छ, शाल व श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार केले. संस्थेचे विश्वस्त व माजी अध्यक्ष शेखर. व्दा. म्हात्रे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच नवनिवार्चित अध्यक्ष विकास महाजन यांचे सुध्दा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यकमास रोटरी एज्युकेशन सोसायटीचे जॉईंट सेक्रेटरी शेखर व्दा म्हात्रे, खजिनदार प्रसन्नाकुमार, विश्वस्त डॉ. बी.व्ही. देवणीकर, व पालक शिक्षक संघटनाचे उपाध्यक्षा प्रिया थळी उपस्थित होत्या.
संजिता थळी- मुख्याध्यापिका यांनी आभार मानले.
रोटरी इंग्लिश मिडियम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात
Reviewed by ANN news network
on
१२/२९/२०२३ १०:५०:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१२/२९/२०२३ १०:५०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: