सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यात हाणामारी (VIDEO)

 


पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात भोजनगृहाजवळ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या दोन संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. दोन्ही गटातील काहीजण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दोन्ही गटांची बाजू ऐकून घेतली असल्याचे विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाकडून कळते.

विद्यार्थी सदस्य नोंदणीच्या मुद्द्यावरून ही हाणामारी झाली असल्याचे समजते. अभाविपने आपल्या सदस्य नोंदणीत अडथळा आणला असा आरोप एसएफआयने केला आहे. तर, अभाविपने एसएफआयचे कार्य़कर्ते जबरदस्तीने सदस्य नोंदणी करत असल्याचा आरोप केला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यात हाणामारी (VIDEO) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यात हाणामारी (VIDEO) Reviewed by ANN news network on ११/०२/२०२३ १२:२८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".