नवले पुलावर आंदोलन करणाऱ्या ५०० जणांविरूद्ध गुन्हा दाखल

 


पुणे : मराठा आरक्षणासाठी मंगळवारी (ता. ३१) नवले पुलाजवळ  जमावाने मोठ्या प्रमाणावर टायर जाळून आंदोलन केले होते. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  जमावबंदीचा आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप या सर्वांवर आहे.

 पोलीस हवालदार नितीन खुटवड यांनी या संदर्भात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यावरून रवी पडवळ, प्रशांत पवार, निखिल पानसरे, योगेश दसवडकर, उमेश महाडिक, संतोष साठे, निखिल धुमाळ, समीर घाटे, अभिषेक भरम, विराज सोले यांच्यासह ४०० ते ५०० आंदोलकांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मंगळवारी (ता. ३१) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नवले पुलाजवळ आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी टायर पेटविल्याने वाहतूक ठप्प झाली. खेड-शिवापूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.  आंदोलनात ४०० ते ५०० कार्यकर्ते सहभागी झाले होते.

याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत.

नवले पुलावर आंदोलन करणाऱ्या ५०० जणांविरूद्ध गुन्हा दाखल नवले पुलावर आंदोलन करणाऱ्या ५०० जणांविरूद्ध गुन्हा दाखल Reviewed by ANN news network on ११/०१/२०२३ ११:५६:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".