सर्वपक्षीय आमदारांचा मंत्रालयासमोर आक्रोश; मंत्रालयाला ठोकले टाळे!


मुंबई : मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलविण्याच्या मागणीसाठी आज सर्वपक्षीय आमदार आक्रमक झाले असून या मागणीसाठी मंत्रालयाला टाळे ठोकण्यात आले आहे.मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदारांचा मंत्रालय परिसरात आक्रोश सुरू आहे.

राजू नवघरे, अमोल मिटकरी, राहुल पाटील, कैलास पाटील, विक्रम काळे, चेतन तुपे, बाबासाहेब आजबे, यशवंत माने, निलेश लंके, बाळासाहेब पाटील, दिलीप बनकर, बाबाजानी दुर्रानी, मोहन उबर्डे हे आमदार मंत्रालय यामध्ये सहभागी झाले आहेत. 

दरम्यान, आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला सर्व पक्षाचे नेते उपस्थित आहेत.

अपडेट 

या आमदारांना आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आक्रमकआमदारांनी आम्ही आमच्या समाजासाठी भूमिका घेत आहोत. यात चुकीचे काय आहे? आम्हाला ताब्यात घेण्यापेक्षा आरक्षण द्या, अशी मागणी आमदारांनी केली

सर्वपक्षीय आमदारांचा मंत्रालयासमोर आक्रोश; मंत्रालयाला ठोकले टाळे! सर्वपक्षीय आमदारांचा मंत्रालयासमोर आक्रोश; मंत्रालयाला ठोकले टाळे! Reviewed by ANN news network on ११/०१/२०२३ १२:२६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".