पनवेल : मुंबई पुणे महामार्गावर खोपोलीनजिक एका रुग्णवाहिकेचा स्फ़ोट झाला. त्यात रुग्णवाहिकेतील रुग्णमहिलेचा जागीच मृत्यू झाला.
खोपोली पोलीसठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला असून त्यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव निलव्वा कवलदार असे होते. तिला या रुग्णवाहिकेतून व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सपोर्टवर गुलबर्गा (कर्नाटक) येथे नेले जात होते. अपघातस्थळानजिक रुग्णवाहिका आल्यानंतर रुग्णवाहित बिघाड झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने रुग्णवाहिका थांबविली. तितक्यात रुग्णवाहिकेने पेट घेतला. अन्य प्रवासी बाहेर पडले. मात्र, तितक्यात आतील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला आणि रुग्णमहिलेचा स्फ़ोटात जागीच मृत्यू झाला.
अपघाताची बातमी कळताच वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस, देवदूत यंत्रणा, आयआरबी पेट्रोलिंग, फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य रुग्णवाहिका सेवा आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी धाव घेऊन मदत व बचावकार्य सुरू केले.
खोपोली पोलीस पुढील तपास करत आहेत.
Reviewed by ANN news network
on
११/०१/२०२३ ११:३०:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: