राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमासाठी ७ अत्याधुनिक वाहने महापालिकेच्या ताफ्यात दाखल..

 


पिंपरी :  शहरातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत दोन अत्याधुनिक वाहनांचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत करण्यात आले.

या उद्घाटनाच्या वेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटीलउल्हास जगतापसह शहर अभियंता संजय कुलकर्णीउप आयुक्त रविकिरण घोडकेसहाय्यक आयुक्त यशवंत डांगेमुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडेविशेष अधिकारी किरण गायकवाडजनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

१५ व्या केंद्रिय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस हवेची गुणवत्ता सुधारणेसंरक्षणपुरवठा आणि पाण्याचे व्यवस्थापन आणि कार्यक्षम घनकचरा व्यवस्थापन उपाय यासाठी निधी मंजुर करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या राष्ट्रीय शुद्ध हवा अभियान अंतर्गत शहर कार्य आराखड्यास (सिटी क्शन प्लॅन) केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून मंजूरी प्राप्त झालेली आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याकरिता शहरातील रस्त्यांची रोड वॉशर सिस्टीम असलेल्या २ वाहनांद्वारे साफसफाई करणेत येणार आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरील धुलीकणांचे प्रमाण कमी होणार आहे. तसेच शहरातील मुख्य चौकांचे हवा प्रदुषण कमी करण्यासाठी मुव्हेबल फॉग कॅनन डस्ट सप्रेशन प्रणाली ५ वाहनांवर बसविणेत आली आहे. सदरची यंत्रणा कार्यान्वित झाल्यास यंत्रणा बसविलेच्या परिसरातील पीएम-१०पीएम-२.५एसओएक्सएनओएक्स इत्यादी वायु प्रदुषकांची पातळी मर्यादित राहणार आहे, अशी माहिती सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली.

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमासाठी ७ अत्याधुनिक वाहने महापालिकेच्या ताफ्यात दाखल.. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमासाठी ७ अत्याधुनिक वाहने महापालिकेच्या ताफ्यात दाखल.. Reviewed by ANN news network on ११/१०/२०२३ ०७:००:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".