पिंपरी पालिकेच्या अनेक विकासकामांना प्रशासक शेखर सिंह यांची मान्यता

 


पिंपरी : आरोग्य विघातक कृत्य करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई व वसुली विषयक कामकाजासाठी (ट्रान्सजेंडर) व्यक्तींच्या बचत गटास काम देणेबाबत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समिती सभेत मान्यता दिली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झालीबैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह होते.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटीलउल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

मनपाचे प्रभाग क्र.१९ बी ब्लॉकभाटनगरकोहिनूर शांग्रीला, सुदर्शननगर, गोलांडे इस्टेट व इतर परिसरामधील डांबरी रस्त्याची दुरुस्तीची कामे करणेकामी तसेच स्मशानभूमी व दफनभूमीमध्ये स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे प्रभाग क्र. १४, मुख्य अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणेकामी, काळभोरनगर व परिसरातील शाळा इमारतींची देखभाल दुरूस्ती करणेकामी तसेच प्रभाग क्र. १५ निगडी प्राधिकरण परिसरात डांबरीकरणाची कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

इंडियन स्वच्छता लीग २.० च्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन  करून सर्व नागरिकांना जनजागृती करणेबाबत तसेच प्रभाग क्र. २ चिखली, जाधववाडी व इतर परिसरात स्थापत्य विषयक दुरूस्तीची कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे प्रभाग क्र. २ जाधववाडी, वडाचा मळा परिसरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी वाहून जाणेकरिता आरसीसी पाईप लाईन  टाकणे व इतर अनुषंगिक कामे करणेकामी तसेच क्रीडा विभागाकडील शासकीय जिल्हास्तर शालेय क्रिडा स्पर्धा २०२२-२३ करिता साहित्य खरेदी करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे पशुवैद्यकीय विभागाकरिता लसी खरेदी करणेकामी तसेच इ प्रभाग, ग प्रभाग, क प्रभागामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा उभारणेकामी तसेच सर्व माध्यमिक शाळांमध्ये उभारण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेची वार्षिक तत्वावर देखभाल दुरूस्ती करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.  

ई क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मोशी, चऱ्होली, वडमुखवाडी, डुडूळगाव येथील नाल्यामधील व इतर ठिकाणी मल:निसारण नलिकांमध्ये सुधारणा करणेकामी तसेच मनपाचे प्रभाग क्र. १७ मधील विविध भागात आवश्यकतेनुसार स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे प्रभाग क्र. १६ मधील रावेत भागातील गुरूद्वारा परिसर व सायली कॉम्प्लेक्स परिसरात स्थापत्य विषयक कामे करणेकामी तसेच प्रभाग क्र. १७ मधील प्रेमलोकपार्क, दळवीनगर इ. भागात आवश्यकतेनुसार स्थापत्य विषयक दुरूस्तीची कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. ८ येथील शरयु टोयोटा शेजारील नाला बांधणे व इतर ठिकाणी स्थापत्य विषयक कामे करणेकामी तसेच प्रभाग क्र. १६ मधील रावेत भागातील शिंदेवस्ती व पेठ क्र. २९, ३० व ३२ अ परिसरात, प्रभाग क्र. १७ मधील चिंचंवडेनगर भागात स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणाऱ्या करण्यास मान्यता देण्यात आली.

          प्रभाग क्र. २४ थेरगावमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविणे, ट्रीमिक्स करणे व इतर स्थापत्य विषयक कामे करणेकामी तसेच प्रभाग क्र. २१ पिंपरी मधील मनपाचे कमला नेहरू शाळेमधील उर्वरित इमारतीचे स्थापत्य विषयक कामे व रंगरांगोटी करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. 

मनपाचे इ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत भोसरी, दिघी, बोपखेल येथील नाल्यामधील व इतर ठिकाणी मनि:सारण नलिकांमध्ये सुधारणा करणेकामी, कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत यशवंतनगर ते नेहरूनगर, गांधीनगर, खराळवाडी व धावडेवस्ती ते चक्रपाणीवसाहत, सद्गुरूनगर आणि उर्वरित भागात जलनि:सारण विषयक सुधारणा कामे करणेकामी तसेच प्रभाग क्र. २३ थेरगाव गावठाण येथील शाळा व इतर इमारतीमधील स्थापत्य विषयक दुरूस्तीची कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

पिंपरी पालिकेच्या अनेक विकासकामांना प्रशासक शेखर सिंह यांची मान्यता पिंपरी पालिकेच्या अनेक विकासकामांना प्रशासक शेखर सिंह यांची मान्यता Reviewed by ANN news network on ११/१०/२०२३ ०७:११:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".