नितीशकुमार यांनी देशभरातील महिलांची माफी मागावी : सुजाता पालांडे

 



पिंपरीत भाजपाच्या वतीने नितीश कुमार यांच्या वक्तव्याचा निषेध

पिंपरी : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकसंख्या नियंत्रणावरुन केलेल्या वक्तव्याचा पिंपरी चिंचवड भाजपा महिला मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करून महिलांनी घोषणाबाजी करत नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची मागणी यावेळी केली.

भाजपा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) अध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी, भाजपा महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा सुजाता पालांडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य कविता हिंगे, महिला मोर्चा सरचिटणीस वैशाली खाडये, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, वर्षा गायकवाड, प्रतिभा जवळकर, सीमा बोरसे, पल्लवी मारकड यांच्यासह प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस अनुप मोरे, सरचिटणीस संजय मंगोडेकर, प्रकाश जवळकरदेवदत्त लांडेमुकेश चुडासमाभरत सोलंकीसहादु (अप्पा) धावडेप्रदीप बेंद्रे यांच्यासह मोठया संख्येने विविध आघाडयांचे पदाधिकारी उपस्थित होते.

नितीश कुमार यांच्या वक्तव्याबद्दल भाजपा ‍महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा सुजाता पालांडे म्‍हणाल्या की, नितीश कुमार यांनी महिलांप्रती वापरलेले भाष्य हे भारतीय संविधानाचे अवमान करणारे आहे. विधानसभेतील एक नेता अशा प्रकारची कशी काय भाषा वापरु शकतो, हे मुख्यमंत्री पदाला न शोभणारे निर्लज्ज पातळीवरचं विधान आहे. त्यांनी देशातील तमाम महिलांची माफी मागावी. अशा प्रकारची ही भाषा नितीश कुमार यांनी शोभत नाही. कारण ते बिहारचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यासारख्या नेत्याकडून विधानसभेची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे पण तसं काही झालं नाही. त्यांनी केलेले विधान हे अत्यंत निर्लज्ज पातळीवरचं विधान आहे, त्यांनी देशभरातील महिलांची माफी मागावी, अशा शब्दात त्यांनी टीका केली.

नितीशकुमार यांनी देशभरातील महिलांची माफी मागावी : सुजाता पालांडे नितीशकुमार यांनी देशभरातील महिलांची माफी मागावी : सुजाता पालांडे Reviewed by ANN news network on ११/१०/२०२३ ०६:५६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".