इस्त्रायल हमास युद्धात आता येमेनी दहशतवादी गटाचा शिरकाव; सौदी अरेबियाची चिंता वाढणार

नवी दिल्ली : इस्त्रायल आणि हमास युद्धात आता येमेनमधील हुथी दहशतवादी गटाने शिरकाव केला आहे. इस्त्रायलवर मोठ्या प्रमाणात बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे तसेच ड्रोन सोडल्याचा दावा या गटाकडून मंगळवारी करण्यात आला.

हुथीचा प्रवक्ता याह्या सारिया याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा दावा केला आहे.  "पॅलेस्टाईनमधील आमच्या छळलेल्या बांधवांच्या समर्थनार्थ" आम्ही हा हल्ला केला असे त्याने म्हटले आहे.

इस्त्रायली सेनाधिकारयांनी लालसमुद्राच्या भागातून  इस्रायलच्या दिशेने डागलेले क्षेपणास्त्र व इतर हवाई धोके रोखले आहेत; यातील एकही क्षेपणास्त्राने इस्रायली प्रदेशात प्रवेश केला नाही असे म्हटले आहे. त्यामुळे हुथीच्या दाव्यात तत्थ्य असल्याचे दिसून येत आहे.

मात्र, या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे हे इस्रायली लष्कराने स्पष्टपणे सांगितले नाही. परंतु अमेरिकेच्या संरक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, इस्रायली सैन्याने येमेनमधून सोडलेली क्षेपणास्त्रे रोखली आहेत ज्यांचा पल्ला सुमारे १ हजार २०० मैल आहे.

यासर्व प्रकारामुळे सौदी अरेबियाची चिंता वाढली आहे. सौदी अरेबियाच्या एका बाजूस इस्त्रायल असून दुसर्या बाजूस येमेन आहे. त्यामुळे इस्त्रायल विरुद्ध येमेन हा युद्धाचा नवा मोर्चा उघडला गेला दोन्ही बाजू एकमेकांवर जी क्षेपणास्त्रे डागतील ती सौदी अरेबियाच्या अवकाशातून जातील त्यातील काही चुकून सौदी अरेबियात पडली तर सौदीचे मोठे नुकसान होऊ शकते.


इस्त्रायल हमास युद्धात आता येमेनी दहशतवादी गटाचा शिरकाव; सौदी अरेबियाची चिंता वाढणार इस्त्रायल हमास युद्धात आता येमेनी दहशतवादी गटाचा शिरकाव; सौदी अरेबियाची चिंता वाढणार Reviewed by ANN news network on ११/०१/२०२३ ०८:१३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".