एअर पिस्तूलमध्ये आर्या म्हस्केला सुवर्ण पदक

 

पिंपरी : अकलूज येथे झालेल्या विभागीय शुटिंग स्पर्धेत एस.बी.पाटील पब्लिक स्कूलच्या आर्या म्हस्केने सुवर्ण पदक पटकावले.

अकलूज येथे विभागीय शालेय शूटिंग क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रावेत येथील एस.बी.पाटील पब्लिक स्कूल मधिल आठव्या इयत्तेची विद्यार्थिनी आर्या म्हस्के हिने शालेय क्रीडा स्पर्धेत विभाग स्तरीय शूटिंग दहा मीटर (एअर पिस्तूल) या प्रकारात सुवर्ण पदक मिळवले. आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी यांनी पुढील स्पर्धेसाठी आर्या म्हस्केला शुभेच्छा दिल्या.
एअर पिस्तूलमध्ये आर्या म्हस्केला सुवर्ण पदक एअर पिस्तूलमध्ये आर्या म्हस्केला सुवर्ण पदक Reviewed by ANN news network on ११/०३/२०२३ ०८:१६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".