एयर इंडिया पुढील सहा महिन्यांत रूट नेटवर्कमध्ये ४००+ साप्ताहिक विमानसेवा समाविष्ट करणार

            


              ·         उत्तर अमेरिका, युरोप आणि आग्नेय आशियामध्ये आंतरराष्ट्रीय विस्ताराचे नियोजन

·         ४ नवी आंतरराष्ट्रीय ठिकाणांचा समावेश 


·         ३०+ नवी विमाने पुढील सहा महिन्यांत अपेक्षित

 

गुरुग्राम :  एयर इंडिया या भारतातील आघाडीच्या जागतिक विमानसेवा कंपनीने आपल्या हिवाळी वेळापत्रक २३ चा एक भाग म्हणून मार्च २०२४ पर्यंत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय रूट नेटवर्कमध्ये ४०० पेक्षा जास्त विमानसेवांचा समावेश करणार असल्याचे आज जाहीर केले.

 

पुढील सहा महिन्यांत सहा नवी विमाने समाविष्ट होणार असून त्यांच्या मदतीने एयर इंडियाने भारतातील नेटवर्क मजबूत करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी कंपनी मुंबई व दिल्लीसह भारतातील प्रमुख शहरांत २०० साप्ताहिक विमानसेवांचा समावेश केला जाणार आहे. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय मार्गांवर कंपनी २०० साप्ताहिक विमानसेवांचा समावेश करणार असून त्यापैकी ८० साप्ताहिक विमानसेवा यापूर्वीच सुरू करण्यात आल्या आहेत. एयर इंडियाने आपल्या नेटवर्कमध्ये चार नवीन आंतरराष्ट्रीय ठिकाणांचा समावेश करण्याचे ठरवले असून ही ठिकाणे लवकरच जाहीर केली जातील.

 

हिवाळी वेळापत्रक २३ च्या पार्श्वभूमीवर कंपनीने आग्नेय आशिया, अमेरिका आणि युरोप अशा आंतरराष्ट्रीय साप्ताहिक विमानसेवांची फ्रीक्वेन्सी २५ नी (प्रत्येक मार्गावर) वाढवली आहे. त्यानुसार आता मुंबई- सिंगापूर विमानसेवांची साप्ताहिक फ्रीक्वेन्सी ७ वरून १३ पर्यंत, दिल्ली- बँकॉकची ७ वरून १४ वर, दिल्ली- ढाका ७ वरून १२ वर, दिल्ली- नेवार्क (न्यू जर्सी) ३ वरून ४ वर, दिल्ली- सॅन फ्रान्सिस्कोची १० वरून ११ वर, दिल्ली- वॉशिंग्टन डीसीची ३ वरून ४ वर, दिल्ली- कोपेनहेगनची ३ वरून ४ वर, दिल्ली- मिलानची ४ वरून ५ वर, मुंबई- डोहाची ७ वरून ९ वर नेण्यात आली आहे.

 

एयर इंडियाने चार नव्या मार्गांवर विमानसेवा सुरू केली असून त्यात बेंगळुरू- सिंगापूर, कोची- डोहा, कोलकाता- बँकाक आणि मुंबई- बेंगळुरू यांचा समावेश आहे.

 

एयर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन म्हणाले, विमानांचे आधुनिकीकरण करणे आणि नवी उत्पादने व सेवा उपलब्ध करणे हा एयर इंडियाच्या स्थित्यंतरातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्याचबरोबर आम्ही रूट नेटवर्कचा विस्तार करून वेगाने वाढत असलेल्या मागण्या पूर्ण करण्यावर तितकाच भर देत आहोत. पुढील काही महिने एयर इंडिया व आमच्या प्रवाशांसाठी उत्सुकतापूर्ण असतील.

 

आत्ता आणि मार्च २०२४ दरम्यान एयर इंडिया आपल्या ताफ्यात सहा A350, चार B777 आणि २० A320neos सह ३० वाइडबॉडी आणि नॅरोबॉडी विमानांचा समावेश करणार आहे.

एयर इंडिया पुढील सहा महिन्यांत रूट नेटवर्कमध्ये ४००+ साप्ताहिक विमानसेवा समाविष्ट करणार एयर इंडिया पुढील सहा महिन्यांत रूट नेटवर्कमध्ये ४००+ साप्ताहिक विमानसेवा समाविष्ट करणार Reviewed by ANN news network on ११/०३/२०२३ ०८:१३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".