मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण देऊ नका!; मारुती भापकर यांचे आवाहन

पिंपरी : मराठा आरक्षणासाठी राज्यात जागोजागी आंदोलने, उपोषणे सुरू आहेत. काल बीड येथ्वे लोकप्रतिनिधींच्या घरावर हल्ला झाला. जाळपोळ झाली ही घटना अतिशय गंभीर आणि चुकीची घडली आहे.  या घट्ना आंदोलनाला असणारी सहानुभूती , पाठिंबा कमी करणारया आहेत. त्यामुळे असे प्रकार घडू नयेत. असे आवाहन मारुती भापकर यांनी केले आहे. 

भापकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन करताना साखळी उपोषण‌, आमरण उपोषण, कॅण्डल मार्च, पुढारयांना गाव बंदी ,शहरबंदी आंदोलन करण्याची चौकट सकल मराठा समाजाला आखून दिली आहे.तसेच हे आंदोलन करताना कुठेही जाळपोळ, हिंसाचार होणार नाही.अशा वारंवार स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यांचे पालन आंदोलकांनी करणे आवश्यक आहे.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये  जरांगे पाटील यांनी दिलेल्या चौकटीतच आंदोलने व्हावीत कुठेही जाळपोळ हिंसाचार होऊ नये, कुठल्याही खोट्या पोस्ट,अफावांवर विश्वास कार्यकर्त्यांनी ठेवू नये,तसेच अनेक तरुण आत्महत्या सारख्या मार्ग निवडून स्वतःचे व कुटुंबाचे खूप मोठे नुकसान करून घेत आहेत. त्यामुळे कोणीही आत्महत्या करू नये.अशी सर्व सकल मराठा समाज व क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना नम्रतेची विनंती आहे; असे भापकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 


मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण देऊ नका!; मारुती भापकर यांचे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण देऊ नका!; मारुती भापकर यांचे आवाहन Reviewed by ANN news network on ११/०१/२०२३ ०१:३९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".