वंचित घटकांसाठी सर्वानीच पुढाकार घेणे गरजेचे : चंद्रकांत पाटील


 शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यातर्फे दीपावली फराळाचे वाटप

पिंपरी : सर्वत्र दिवाळी आनंदाने आणि उत्साहाने साजरी होत असताना समाजातील निराधारगरीब मात्र या आनंदापासून दूर राहू नयेत. या वंचित घटकांना देखील दीपावलीचा आनंद घेता यावायासाठी सर्वानीच पुढाकार घेणे गरजेचे आहेअसे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम येथील गरीब आणि अनाथ मुलांसाठी आज दीपावली साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीशजी प्रभुणेभाजपा शहराध्यक्ष शंकर जगतापमाजी नगरसेवक राजाभाऊ बराटेकार्यवाह सतीश गोरडेविश्वस्त मिलिंदराव देशपांडेकोशाध्यक्ष रवी नामदेसदस्य आसाराम कसबे, ‘डीआरडीओ’चे शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक नगरकरशिक्षण विभाग प्रमुख प्रा. दिगंबर ढोकलेअतुल आडेयोगेश चिंचवडेअजित कुलथेरवींद्र देशपांडे आदी उपस्थित होते.

यावेळी माजी नगरसेवक राजाभाऊ बराटे यांच्या वतीने गुरुकुलम येथील मुलांना नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले. भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या वतीने या विद्यार्थ्यांसाठी फराळाचे साहित्याचे वाटप करण्यात आले.

शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले कीदीपावली हा दिव्यांचा सण असून या सणामध्ये प्रत्येक जण आनंद व्यक्त करत असतो. गरीबनिराधार या मुलांना देखील आनंद व्यक्त करण्याचा अधिकार आहे. दीपावलीच्या निमित्ताने आम्ही सर्व जण आपल्यासोबत आहोतहा विश्वास मुलामध्ये निर्माण करण्याचा हा छोटासा प्रयत्न आमच्या वतीने करण्यात आला.


वंचितनिराधार मुले देखील सामाजाचा घटक आहेत. यांना देखील आपल्या प्रमाणे सणसमारंभ यांचा आनंद घ्यायचा असतो. परंतूत्यांना त्यांच्या परिस्थितीमुळे या गोष्टींचा आनंद घेता येत नाही. यासाठीच सर्वानीच या मुलांना मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करणे गरजेचे आहे असे  शंकर जगताप यावेळी म्हणाले.

वंचित घटकांसाठी सर्वानीच पुढाकार घेणे गरजेचे : चंद्रकांत पाटील वंचित घटकांसाठी सर्वानीच पुढाकार घेणे गरजेचे :  चंद्रकांत पाटील Reviewed by ANN news network on ११/१०/२०२३ ०७:३३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".