भोसरी: जिल्हा क्रीडा संकुल, बारामती येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय लांडेवाडी भोसरी येथील सौरभ दिपक जाधव (बारावी कला) या विद्यार्थी खेळाडूने फ्रीस्टाइल या क्रीडा प्रकारात 19 वर्षाखालील मुलांच्या गटात 92 किलोग्रॅम वजनी गटात सुवर्णपदक प्राप्त केले व यश राहुल मोरे (बारावी वाणिज्य) या विद्यार्थी खेळाडूंनी ग्रीको रोमन या क्रीडा प्रकारात 77 किलोग्रॅम वजन गटात रौप्यपदक मिळविले.त्यामुळे सुवर्णपदक प्राप्त या खेळाडूंची दिल्ली येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.तसेच या पुर्वी सौरभ जाधव या खेळाडूंनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत 92 किलोग्रॅम वजनी गटात रौप्यपदक प्राप्त केले आहे. या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक प्रा.गोपीचंद करंडे यांनी विशेष मार्गदर्शन केले.
या खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार विलास लांडे यांनी विशेष अभिनंदन करून खेळाडूंना राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे खजिनदार व पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, सचिव सुधीर मुंगसे, विश्वस्त व नगरसेवक विक्रांत लांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.जी. कानडे, उपप्राचार्य प्रा.किरण चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.नेहा बोरसे, रजिस्ट्रार अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा.योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
शालेय राष्ट्रीय कुस्तीस्पर्धेसाठी सौरभ जाधवची निवड
Reviewed by ANN news network
on
११/११/२०२३ ०२:३७:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
११/११/२०२३ ०२:३७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: