मुंबई : राज्यशासनाने आज ५ आयएएस अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्या झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे,
1. श्री आशीष शर्मा, IAS (1997) उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव यांची, राज्य कर (GST), मुंबई येथे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2. श्री प्रवीण पुरी, IAS (2011) सहसचिव, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अपंग व्यक्तींसाठी आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3. श्री दीपक तावरे, IAS (2013) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे यांची नियुक्ती आयुक्त, कर्मचारी राज्य विमा योजना, मुंबई म्हणून करण्यात आली आहे.
4. श्री विकास पानसरे, IAS (2014) अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, अहमदनगर यांची अतिरिक्त विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
5. श्री अमन मित्तल, IAS (2015) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई यांना उपसचिव, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
Reviewed by ANN news network
on
११/१३/२०२३ ०९:५७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: