पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने आळंदी परिसरात बेकायदेशीरपणे गॅस सिलेंडर भरण्याचा व्यवसाय चालू असलेल्या एका ठिकाणी छापा घालून ५९ गॅस सिलेंडर जप्त केले या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
संदीप नरसिंग लांडगे वय-२४ वर्षे रा. देवनिवास बिल्डिंग, रुम नं. १, ठाकूरवस्ती, मरकळ रोड, आळंदी, पुणे असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात आळंदी पोलीस ठाण्यात ३०९/२०२३ क्रमांकाने आणि भा.दं.वि कलम ४२०, २८५, २८६ सह जीवनावश्यक वस्तुंचा कायदा १९५५ चे कलम ३,७ सह स्फोटक पदार्थ अधिनियम सन १९०८ चे कलम ५ खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकजण आळंदी, मरकळ रोड, धानोरेफाटा येथील पत्र्याच्या खोलीत घरगुती गॅस सिलेंडर मधून ४ किलोच्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस रिफील करुन त्याची विक्री करत आहे अशी माहिती पोलीस हवालदार प्रदीप गोडांबे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तेथे छापा घातला असता आरोपी मुद्देमालासह तेथे आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक करून मुद्देमाल जप्त केला.
या छाप्यात ०८ घरगुती वापराचे सिलेंडर, ०१ व्यवसायिक सिलेंडर, १३ लहान गॅस भरलेले सिलेंडर, ३७ रिकामे लहान सिलेंडर, ०५ पितळी रीफीलर नोजल, ०२ गॅस रिफिलिंग सर्किट असा ६२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
Reviewed by ANN news network
on
११/२८/२०२३ ०६:२२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: