डी.वाय.पाटील एज्युकेशनल कॅम्पसमध्ये 'टेडेक्स लोणावळा' कार्यक्रम

 


आकुर्डी  : डी.वाय.पाटील एज्युकेशनल कॅम्पस (आकुर्डी) येथे आयोजित करण्यात आलेल्या 'टेडेक्स लोणावळा'  या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.सिंपलीफाय सक्सेस,मॅग्नीफिक,डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज,रोटरी क्लब ऑफ पुणे बंडगार्डन,इव्हेन्ट ग्लीन्ट,युनी सेऊल,हस्त संस्कृती,सागर अंभोरे,योकराज,डेकोर,एमएसडी इव्हेंट्स यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता जयकर प्रमुख पाहुण्या  म्हणून उपस्थित होत्या.प्रेरक व्याख्याने,मान्यवरांचा जीवनानुभवांचा  संवाद, विद्यार्थ्यांचा फॅशन शो,रॉक बँड,नृत्य,संगीत हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते.'थिंक बियॉंड'या संकल्पनेवर हा कार्यक्रम आधारित होता. 

  डॉ.श्वेता पाटील,डॉ.भरत पाटील,डॉ.तेजस पाटील यांची  प्रमुख उपस्थिती होती.सनदी अधिकारी शुभम गुप्ता,अभिनेत्री अन्वेशी जैन,इंदू साहू,सुमन रंगभाष्यम,बिना मॅथ्यूज,दिप्ती हेगडे,रक्षिता मेहता,रिद्धी चढ्ढा,रामबाबू दंतू,अमर बहाडा,रघुनंदन चौद्रपू,अनिरुद्ध भागवत यांनी उपस्थितांशी संवाद साधला.डॉ.सिद्धार्थ किशोर गौर,रवी नाडर,मणीकिंदन एम एस,श्रीधर एम.के.,गुरप्रीत कौर,दीपन्विता संबुई,दिलशाद हुसेन यांनी  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.या कार्यक्रमातून रोटरी पोलिओ फाउंडेशनला आर्थिक मदत करण्यात आली.रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या वतीने मुकेश गुप्ता हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.सुशांत कुमार,अनिरुद्ध पाठक यांनी सूत्रसंचालन केले. 

डी.वाय.पाटील एज्युकेशनल कॅम्पसमध्ये 'टेडेक्स लोणावळा' कार्यक्रम डी.वाय.पाटील एज्युकेशनल कॅम्पसमध्ये 'टेडेक्स लोणावळा' कार्यक्रम Reviewed by ANN news network on ११/०१/२०२३ ०४:१४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".