विधीमंडळाच्या पायऱ्यांवर केले आंदोलन
मुंबई : मराठा आरक्षणासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. या वेळी सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्र्यांचा तातडीने राजीनामा घेण्याची जोरदार मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.
हे सरकार अतिशय असंवेदनशीलआहे आणि हे सगळं पूर्ण अपयश हे सरकारचं आहेच; पण त्याच्यात गृहमंत्रालयाचं जास्त आहे, त्यामुळे या राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीनं राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. सत्तेत असलेल्या आमदारांचाही या ट्रिपल इंजिन खोके सरकारवर विश्वास नाही, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला.
Reviewed by ANN news network
on
११/०१/२०२३ ०३:५३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: