मुंबई : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची आकाशवाणी आमदार निवास इथे तोडफोड करण्यात आली आहे. प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
अजय साळुंखे, संतोष निकम, दीपक सहानकोरे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही संभाजीनगर येथून आल्याचे समजते. या प्रकारामुळे मंत्रालय परिसरात खळबळ उडाली आहे.
या तिघांनी मुश्रीफांची गाडी हेरून तिची तोडफोड केली आहे. मंत्रालय आणि आसपासच्या परिसरात आता पोलीस फौजफाटा वाढवण्यात आला आहे. मंत्रालयातही येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना आत सोडलं जात आहे.
या प्रकारानंतर मुश्रीफ यांच्या कागल, कोल्हापूर इथल्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
दरम्यान मी सुरक्षित आहे. ज्यांनी माझ्या गाडीची तोडफोड केली, त्या तरुणांना त्यांना कोणतीही शिक्षा करू नये, सोडून द्यावे. मराठा समाज हा आमचाच समाज आहे. आरक्षण मिळेपर्यंत आम्ही मराठा समाजाच्या पाठीशी राहणार आहोत. मंत्र्यांची घरे जाळणे हे अत्यंत गंभीर आहे. यामुळे आंदोलनाला गालबोट लागत आहे, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे
Reviewed by ANN news network
on
११/०१/२०२३ १०:५७:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: