मेडीबडी आणि आदित्य बिर्ला फायनान्सने हाऊसिंग फायनान्स ग्राहकांसाठी सुरु केला एक्सक्लुसिव्ह हेल्थकेयर प्लॅन

 


मुंबई :  भारतातील सर्वात मोठा डिजिटल हेल्थकेयर प्लॅटफॉर्ममेडीबडी आणि हाऊसिंग फायनान्समधील एक आघाडीची कंपनीआदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने एकत्र मिळून एबीएचएफएलच्या ग्राहकांसाठी एक्सक्लुसिव्ह हेल्थकेयर प्लॅन सुरु केला आहेमेडीबडीच्या एका विशेष प्लॅनमार्फत ग्राहकांना परवडण्याजोग्या आणि सहज उपलब्ध होऊ शकतील अशा आरोग्य देखभाल सेवा प्रस्तुत करणे या धोरणात्मक भागीदारीचे उद्दिष्ट आहे.

मेडीबडी आणि आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स यांच्या दरम्यानच्या सहयोगाने एक अफिनिटी पार्टनरशिप स्थापित केली आहेया फ्रेमवर्कमध्ये एबीएचएफएलच्या ग्राहकांना पोर्टलवर साइन इन केल्यावर या विशेष प्लॅनचे लाभ मिळवता येतीलएबीएचएफएलच्या गृहकर्ज सेवांव्यतिरिक्त हा अजून एक अतिरिक्त लाभ ग्राहकांना मिळेलमेडीबडी खूपच कमी किमतीतफक्त २९९ रुपयांमध्येआरोग्य देखभालीच्या विशेष सेवा प्रदान करेलज्यामध्ये ओपीडीलॅब टेस्ट्समध्ये १००० रुपयांचे लाभहेल्थ पॅकेजेस आणि फार्मसीवर होणाऱ्या खर्चावर ५०० रुपयांची सूट यांचा समावेश आहेमेडीबडी एबीएचएफएलचे एकमेव आणि विशेष हेल्थकेयर पार्टनर आहेतमेडीबडी प्लॅन सर्व एबीएचएफएल ग्राहकांना त्यांच्या पोर्टलवर एक डिफॉल्ट ऑफरिंग म्हणून अतिशय सहजपणे उपलब्ध करवून दिला जाईलया भागीदारीच्या अटी  शर्ती एबीएचएफएलच्या ग्राहकांची सुविधा डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आल्या आहेत.

या भागीदारीबद्दल मेडीबडीचे सहसंस्थापक  सीईओ श्री सतीश कन्नन यांनी सांगितले"आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्ससोबत आमच्या भागीदारीने आम्हाला त्यांच्या ग्राहकांना आमचे अनोखे हेल्थकेयर लाभ प्रदान करण्यासाठी सक्षम बनवले आहेया भागीदारीच्या माध्यमातून आम्ही आमच्या सेवा अजून अनेक ग्राहकांपर्यंत घेऊन जाऊ इच्छितोत्यांना परवडण्याजोग्या दरामध्ये उच्च दर्जाच्या आरोग्य देखभाल सेवा देऊ इच्छितोही भागीदारी मेडीबडीसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहेआघाडीच्या हाऊसिंग फायनान्स कंपनीसोबत हे आमचे पहिले व्हेंचर आहेआम्हाला खात्री आहे कीही भागीदारी दोन्ही कंपन्यांसाठी लाभदायक ठरेल."

भारतात असे अनेक लोक आहेत ज्यांना उच्च दर्जाच्या आरोग्य देखभाल सेवा मिळू शकत नाहीत, त्यामुळे गरजा आणि त्या पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सेवांदरम्यान खूप मोठी दरी निर्माण झाली आहे. या विशेष प्लॅनसह, मेडीबडी आणि आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स परवडण्याजोग्या आरोग्य देखभाल सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बांधील आहेत. खासकरून ज्यांना महागड्या प्राथमिक आरोग्य देखभाल सेवा सहजपणे मिळू शकत नाहीत अशा ग्राहकांपर्यंत आपल्या सेवा पोहोचवणे त्यांचे उद्दिष्ट आहे.

मेडीबडी आणि आदित्य बिर्ला फायनान्सने हाऊसिंग फायनान्स ग्राहकांसाठी सुरु केला एक्सक्लुसिव्ह हेल्थकेयर प्लॅन मेडीबडी आणि आदित्य बिर्ला फायनान्सने हाऊसिंग फायनान्स ग्राहकांसाठी सुरु केला एक्सक्लुसिव्ह हेल्थकेयर प्लॅन Reviewed by ANN news network on ११/२७/२०२३ ०८:०५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".