भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम
पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत 'अस्मी' या कथक नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नृत्य प्रशिक्षक प्रेरणा देशपांडे यांच्या शिष्या वृंदना मोहरीर,देविका पानसे यांनी बहारदार कथक नृत्य सादर केले .त्यांना ईशान परांजपे(तबला),कृष्णा साळुंके(पखवाज),यशवंत थिटे(हार्मोनियम),शुभम खंडाळकर(गायन) यांनी साथसंगत केली .
हा कार्यक्रम शनीवार, ४ नोव्हेबर २०२३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १८८ वा कार्यक्रम होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले आणि कलाकारांचा सत्कार केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलकनंदा चटर्जी यांनी केले.
'अस्मी ' कथक नृत्य कार्यक्रमास चांगला प्रतिसाद
Reviewed by ANN news network
on
११/०४/२०२३ ०८:२०:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
११/०४/२०२३ ०८:२०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: