नाना काटे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या “एक तास स्वच्छता” मोहीमेस उत्स्फूर्त प्रतिसाद

 


पिंपरी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस” म्हणून देशात साजरा केला जातो. यावर्षी १५ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा हा पंधरवडा उपक्रम देशात राबविण्यात येत आहे. त्यानुसार विठ्ठल उर्फ नाना काटे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता शिवार चौक ते लिनियर गार्डन, पिंपळे सौदागर येथे एकाच वेळी १ तास स्वच्छतेसाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. यानिमित्ताने माजी विरोधीपक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी उपस्थिती लावत स्वच्छते मोहिमेत सहभाग घेतला.

स्वच्छता ही सेवा अभियांनातर्गत आजी माजी नगरसेवकराजकीय पदाधिकारीभारतीय सैन्य दलातील अधिकारीसैनिकमनपाचे कार्यकारी अभियंता नितिन देशमुखउपअभियंता सुनिलदत्त नरोटेआरोग्य अधिकारी प्रणय चव्हाणकनिष्ठ अभियंता संभाजी गायकवाडविटकरीकुणाल तसेच आयकॅान सोसायटी चे चेअरमन विनोद सुर्वेराजवीर पॅलेस चे संतोष मिश्राविक्रम मोहीतेसतिन देसाईद्वारका सनक्रीस्ट सोसयाटीचे दिपक कोठावदेशिवआंगण सोसायटीचे सतिश डोगंरेजयेश सरोदेराष्ट्रवादी कॉग्रेस असंघटित कामगार संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस मीनाताई मोहितेगौरव शितोळेचैतन्य थोरातविशाल काळेमच्छिंद्र काटेभुषण काटेतसेच महानगरपालिकेचे अधिकारीकर्मचारीविविध सोसायटी चेअरमनसभासदबचत गटातील महिला भगिनी तसेच आरोग्य अधिकारी-कर्मचारीमहापालिकेचे कर्मचारी तसेच पिंपळे सौदागरमधील कै. अण्णासाहेब मगर मनपा शाळेतील शिक्षक व शालेय विद्यार्थी यांनी उपस्थिती लावत पथनाट्य सादर करत स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

नाना काटे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या “एक तास स्वच्छता” मोहीमेस उत्स्फूर्त प्रतिसाद नाना काटे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या “एक तास स्वच्छता” मोहीमेस उत्स्फूर्त प्रतिसाद Reviewed by ANN news network on १०/०१/२०२३ ०४:११:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".