'आंतर-भारती' दिवाळी अंकाचे ​ ४ नोव्हेंबर रोजी प्रकाशन

 

मान्यवरांच्या व्याख्यानातून संविधानाचा जागर  

पुणे : ज्येष्ठ कादंबरीकार आणि मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ​डॉ.लक्ष्मीकांत देशमुख यांनी  संपादित केलेल्या 'आंतरभारती' या दिवाळी अंकाचे प्रकाशन ​संगणकतज्ज्ञ,लेखक अच्युत गोडबोले,संविधान अभ्यासक प्रा.गौतमीपुत्र कांबळे यांच्या हस्ते ४ ​नोव्हेबर रोजी सायंकाळी पाच  वाजता​ महाराष्ट्र साहित्य परिषद(सदाशिव पेठ) येथे होणार आहे.​आंतरभारती ट्रस्ट चे अध्यक्ष पांडुरंग नाडकर्णी  हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.​डॉ.लक्ष्मीकांत देशमुख​ यांचीही विशेष उपस्थिती कार्यक्रमाला असणार आहे. 

आंतरभारती चे राष्ट्रीय सचिव डॉ​.डी​.एस​.कोरे,पुणे शाखेच्या अध्यक्ष अंजली कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. 

यंदाचा ​​आंतरभारती ​दिवाळी अंक हा  ​​'​​मूलभूत अधिकार,कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्वे  विशेषांक​'​आहे.त्यामुळे ' या संवैधानिक मूल्य त्रयींवर ​अच्युत गोडबोले,प्रा.गौतमीपुत्र कांबळे​,डॉ.लक्ष्मीकांत देशमुख यांची व्याख्याने या कार्यक्रमात होणार आहेत. 

प्रबोधनपर वैचारिक दिवाळी अंक  

'आंतर-भारती' या दिवाळी अंकाचे हे ​पाचवे  वर्ष आहे .आंतरभारती ही पूज्य साने गुरुजींच्या विचारांवर आधारित राष्ट्रीय एकात्मता , भारताची बहू धार्मिकता , बहू सांस्कृतिकता , बहू भाषिकता , बंधुता व सहिष्णुता जोपासण्यासाठी आणि प्रबोधनासाठी गेली पन्नास वर्षे काम करणारी स्वायत्त संस्था आहे . प्रबोधनपर वैचारिक दिवाळी अंक ही आंतरभारती दिवाळी अंकाची आता सर्वमान्य व सर्वज्ञात ओळख बनली आहे . 

 ​'मागील ७५ वर्षांत भारतीय नागरिकां​मध्ये संविधानातील  '​​मूलभूत अधिकार,कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्वे' याविषयी किती जागरूकता निर्माण झाली , या साऱ्या प्रश्नांचा वेध घेणारे ​,तत्त्वज्ञान , संकल्पना आणि संविधानिक महत्त्व उलगडून टाकणारे वैचारिक लेख ,मुलाखती व परिसंवाद यांनी हा अंक संपन्न आहे . वाचकांना नवे मूल्यभान  देणारा हा अंक आहे​',असे डॉ लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितले. ​न्या ए पी शाह,यशवंत मनोहर,डॉ नितीश नवसागरे,डॉ अशोक चौसाळकर,डॉ डी एस कोरे,डॉ चैत्रा रेडकर,प्रकाश पवार,सुभाष वारे,डॉ शमसुद्दीन तांबोळी,डॉ हमीद दाभोलकर,अंजली कुलकर्णी,शरद जावडेकर,विजय चोरमारे,प्रा.अविनाश कोल्हे,कलीम अजीम  आदी मान्यवरांनी या अंकासाठी लेखन केले आहे


'आंतर-भारती' दिवाळी अंकाचे ​ ४ नोव्हेंबर रोजी प्रकाशन 'आंतर-भारती'  दिवाळी अंकाचे ​ ४ नोव्हेंबर  रोजी प्रकाशन    Reviewed by ANN news network on १०/३१/२०२३ ०३:१२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".