गांजा विक्रीसाठी आलेले दोघे अटकेत; ३१ किलो गांजा जप्त!

 


पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी पोलिसांनी दोघांना पकडून त्यांच्याकडून ३१ किलो गांजा आणि त्याची वाहतूक करण्यासाठी वापरत असलेला टेम्पो असा एकूण १४ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मैनुददीन अब्दुल सत्तार, वय २३, मूळ राहणार  गील्हाबारी, वार्ड नंबर ३,  थाना जियापोखर, ठाकुरगंज, जिआपोखर,  किशनगंज, बिहार, हल्ली मुक्काम  फेज २ हिंजवडी, पुणे.  बिपलभ बिधन राणा बय.२४, राहणार  फेज २ हिंजवडी, पुणे. अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हे दोघेही वाकडकरवस्ती येथे टेम्पोने गांजा विकण्यासाठी घेऊन येणार असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी रस्त्यात टेम्पो अडवून या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांवर व गांजामालका विरुध्द एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ ( क ), २० (ब) (ii) ( क ), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कामगिरी हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ  निरीक्षक श्रीराम पोळ,   निरीक्षक सुनिल दहिफळे  सोन्याबापू देशमुख,  अवैध धंदे विरोधी पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक अजितकुमार खटाळ, सहायक उपनिरीक्षक महेश वायबसे, हेडकॉन्स्टेबल संतोष डामसे, अंमलदार रवी पवार यांनी केली.

गांजा विक्रीसाठी आलेले दोघे अटकेत; ३१ किलो गांजा जप्त! गांजा विक्रीसाठी आलेले दोघे अटकेत; ३१ किलो गांजा जप्त! Reviewed by ANN news network on १०/३१/२०२३ ०३:३६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".