पिंपरी चिंचवड पालिकेच्या नगरसचिव विभागातील कर्मचा-यांनी घेतले जीआयएस संगणक प्रणालीचे धडे

 



पिंपरी : पारदर्शक प्रशासन व नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी पिंपरी चिंचवड मनपा व स्मार्ट सिटी लि. यांच्या संयुक्त विद्यमानाने जीआयएस सक्षम इआरपी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. महापालिकेच्या नगर सचिव विभागाला बहुतांश प्रक्रिया स्वयंचलित करण्यात मदत होण्यासाठी म्युनिसिपल सेक्रेटरी मॅनेजमेंट सिस्टीम द्वारे नगर सचिव विभागाच्या मुख्य लिपिक, लिपीक, कॉम्पुटर ऑपरेटर आदी कर्मचा-यांना जीआयएस संगणक प्रणालीचे धडे देण्यात आले. यामध्ये, विषय पत्र निर्मिती आणि त्याची मंजुरीअजेंडा अहवालमीटिंग कॅलेंडर, अहवाल वितरणबैठकीचे वृत्तांत, अहवाल तयार करणे, प्रकाशन करणे, नगरसदस्यांचे मानधनडॅशबोर्डबाबत १३० हून अधिक लिपिकवरिष्ठ लिपिकसंगणक परिचालक आदींनी प्रणालीची माहिती घेतली.

आज दि. ०४ रोजी पिंपरी चिंचवड मनपा, कै. मधुकरराव पवळे (स्थायी समिती) सभागृह, तिसरा मजला येथे आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा नगरसचिव विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना जीआयएसचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी कर्मचा-यांच्या अडचणी सोडविण्यात आल्या. यावेळी, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादवमाहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार आदी उपस्थित होते. प्रकल्प सल्लागार कल्पेश बोंडे, ऋषी मौर्य यांनी उपस्थितांना जीआयएस प्रक्रीयेबाबत माहिती दिली.

जीआयएस प्रकल्पांतर्गंत महापालिकेच्या विविध विभागांच्या स्वयंचलित कार्यप्रणालीसाठी ३३ आयटी सॉफ्टवेअर्स एकात्मिक पद्धतीने विकसित करण्यात येत आहे. यामध्येनागरिकांचा सहभाग व पारदर्शक प्रशासनजी.आय.एस. प्रणालीद्वारे महानगरपालिका क्षेत्रामधील मिळकतीसाठी सुधारीत सेवासंसाधनांचे सुधारित नियोजननैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापनआपत्कालीन व्यवस्थापन करण्यास मदत होणार आहे. नागरिकांना भविष्यातील होणारे फायदे लक्षात घेवून जी.आय.एस.प्रणाली राबविण्याचे धोरण आखण्यात आले आहे. या प्रणालीद्वारे महानगरपालिका नगर सचिव विभागाद्वारे सुरू असलेली कार्यप्रणाली यामध्ये, डॉकेट तयार करणेअजेंडा तयार करणे, नगरसेवकांचे मानधनस्थायी समितीची बैठकीची कार्यवाहीसर्वसाधारण सभा डिजीटल करणे इ. प्रक्रिया स्वयंचलित पध्दतीने राबविण्यास मदत होणार आहे.

सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या १००० हून अधिक प्रक्रियांवर पुनर्रचना करण्यात आली आहे. ऐटॉस इंडिया प्रा.लि. यांचे मार्फत सर्व्हेअर / कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहेईआरपीजीआयएस आणि डिजिटल वर्कफ्लो मॅनेजमेंटची संपूर्ण कार्यक्षमता एकमेकांशी जोडलेली आहे. या उपक्रमांतर्गत, जीआयएस ची कार्यक्षमता विभागांच्या दैनंदिन कामकाजाशी जोडली जाणार आहेजेणेकरून पिंपरी चिंचवड महापालिकेचा जीआयएस डेटाबेस सतत आणि रिअल टाइम आधारावर अपडेट करता येईल. जीआयएस सक्षम एकात्मिक (इआरपी) प्रकल्प भारतातील अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहेज्या ठिकाणी महानगरपालिका सर्व विभाग जीआयएस इआरपी द्वारे जोडले जातील. तसेचएंटरप्राइझ-वाइड रिसोर्स प्लॅनिंग दृष्टीकोन द्वारे महानगरपालिकेच्या विविध भू-स्थानिक माहितीचा (डेटासर्वात चांगल्या प्रकारे वापर होऊन नागरिकांना कार्यक्षम आणि प्रभावीपणे सेवा प्रदान करण्यास मदत होणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

पिंपरी चिंचवड पालिकेच्या नगरसचिव विभागातील कर्मचा-यांनी घेतले जीआयएस संगणक प्रणालीचे धडे पिंपरी चिंचवड पालिकेच्या नगरसचिव विभागातील कर्मचा-यांनी घेतले जीआयएस संगणक प्रणालीचे धडे Reviewed by ANN news network on १०/०४/२०२३ ०८:१०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".