प्रलंबित अन्‌ सुरू असलेली विकासकामे मार्गी लावा; भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांची सूचना

 


विकसित पिंपरी-चिंचवडला ‘स्मार्ट’ बनवण्याचा निर्धार!
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सध्या विविध विकासाभिमूख कामे सुरु आहेत. या कामांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मोठा हातभार लागणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये भाजपाचे योगदान आहे. यामुळेच विकसित शहराला अजून ‘स्मार्ट’ बनविण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक कार्यवाही करावी, अशा सूचना भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केल्या.

चिंचवड विधानसभा मतदार संघासह शहरातील कामांना गती यावी व तसेच नवीन प्रकल्प शहरात साकारले जावेत. यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या दालनामध्ये भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने  बैठक घेण्यात आली.
यावेळी माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र राजापुरे, माजी नगरसेवक सागर आंघोळकर यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांची भेट घेताना विकासात्मक कामांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी पिंपळे गुरव येथील व्हिलेज प्लाझा हा प्रकल्प, प्रकल्प विभागाच्या वतीने राबविणे, पिंपळे निलख येथील रक्षक चौकात ग्रेड सेपरेटरच्या बरोबरीने भूयारी मार्गाची निर्मिती करणे, पिंपळे गुरव येथील कल्पतरू सोसायटीसमोर होणाऱ्या वाहतूककोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी प्रकल्पांची चाचपणी करणे, वाल्हेकरवाडी डांगे चौकातील पशुसंवर्धन येथील जागेपासून डांगे चौकाला जोडणारा पूल तयार करणे, सांगवी फाटा येथे नागरिकांसाठी पादचारी पुलाची निर्मिती करणे, औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची अद्ययावत इमारत चिंचवड येथील ‘एम्पायर इस्टेट’ येथे प्रस्तावित करणे, काळेवाडी कुणाल हॉटेल चौक -चिंचवड दरम्यान केशवनगर पुलापर्यंत ‘एलीव्हेटेड’ पुलाची निर्मिती करणे अशी नवी कामे ‘प्रकल्प विभागा’साठी प्रस्तावित करण्यात आली.  

वाकड येथील दत्त मंदिर रस्त्याचे सुरु असलेले काम त्वरीत पूर्ण करणे, पिंपळे गुरव ते दापोडी येथे असलेला अरुंद पूलने होत असलेली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवीन पुलाची निर्मिती करणे, पिंपळे गुरव - नवी सांगवी सीमेवरील कृष्णा चौक ते एम के हॉटेल विकास आराखड्यातील रस्ता विकसित करणे, ‘ब’,‘ड’, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयातील डीपी व अंतर्गत रस्ते विकसित करणे या संदर्भात देखील निवेदन देण्यात आले आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या…
कोणत्याही शहराचे रस्ते हे त्या शहराच्या रक्तवाहिन्या असतात. जोपर्यंत रस्ते विकसित होत नाहीत, तोपर्यंत शहराचा सर्वांगीण विकास होणे शक्य नाही. याच अनुशंगाने शहराच्या विकासाला चालना मिळावी आणि शहराचा भौगोलिक विकास व्हावा, याकरिता आयुक्तांची भेट घेऊन विविध प्रकल्पांची मागणी केली. तसेच, त्या-त्या प्रभागातील माजी नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून समतोल विकासाचे सूत्र राबवावे, अशा सूचनाही जगताप यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.


लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप आणि भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने शहरामध्ये विविध लोकोपयोगी प्रकल्प राबविण्यात आले. त्यामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत सिमेंटचे रस्ते, अर्बन स्ट्रीट, उड्डाणपूल, उद्याने, रुग्णालये, नदी सुधार प्रकल्प, बीआरटीएस अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे शहराला विकासाची नवीन उंची मिळाली. हाच विकासरथ पुढे घेऊन जाण्यासाठी शहरामध्ये नवीन प्रकल्पांची निर्मिती व प्रलंबित प्रकल्पांना चालना देण्यासाठी आज आयुक्तांची भेट घेतली. आयुक्तांनी देखील या बैठकीमध्ये दिलेल्या प्रस्तावांना सकारात्मक प्रतिसाद दिला.

- शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी- चिंचवड.

प्रलंबित अन्‌ सुरू असलेली विकासकामे मार्गी लावा; भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांची सूचना  प्रलंबित अन्‌ सुरू असलेली विकासकामे मार्गी लावा; भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांची सूचना Reviewed by ANN news network on १०/०४/२०२३ ०८:१६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".