पिंपरी : राज्यात सरकारी हॉस्पिटलमध्ये होत असलेले मृत्यू व त्यातही नवजात बालकांचे मृत्यू याची गंभीर दखल महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगातर्फे घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य बालहक्क आयोगाचे सदस्य चैतन्य पुरंदरे यांनी बुधवारी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय रुग्णालयास अचानक भेट देऊन तेथील बालरोग विभागाची पाहणी केली व तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
बालरोग विभागातील व्हेंटिलेटर, ऑक्सिजन यंत्रणा, विविध वैद्यकीय उपकरणे, गंभीर बालकांसाठी असलेली व्यवस्था, अतिदक्षता विभाग, औषधे, लसीचा पुरवठा याचा पुरंदरे यांनी आढावा घेतला. बालरोग विभागात दाखल असलेले एकूण बालरुग्ण, गंभीर, अतिगंभीर बालरुग्ण याबाबत पुरंदरे यांनी माहिती घेतली.
यावेळी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. दीपाली अंबिके उपस्थित होत्या.
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील परिस्थिती समाधानकारक आहे, तसेच पुरेसा अनुभवी कर्मचारी वर्ग, नर्सेस, डॉक्टर्स उपलब्ध आहेत. दाखल होणारी बालरुग्ण संख्या पाहता अजून एका वॉर्डची आवश्यकता आहे, असे पुरंदरे यावेळी म्हणाले.
Reviewed by ANN news network
on
१०/०४/२०२३ ०८:०७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: