नागरिकांना एका क्लिकवर मिळणार मनपा सुविधांची इत्यंभूत माहिती: - आयुक्त शेखर सिंह

 



सिटिझन जिओपोर्टल”चे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते उदघाटन

पिंपरी नागरिकांसाठी ऑनलाइन सेवा सुलभ करणे आणि महानगरपालिकेच्या विभागांच्या अंतर्गत प्रशासन कार्यक्षमतेत सुधारणा करण्याच्या उददेशाने पिंपरी चिंचवड मनपा व स्मार्ट सिटी लि. यांच्या संयुक्त विद्यमानाने जीआयएस सक्षम इआरपी प्रणाली हाती घेण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांना एका क्लिकवर इत्यंभूत सेवांची माहिती देण्यासाठी सिटिझन जिओपोर्टल” सूरू करण्यात आले असूनया पोर्टलचे आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते आजदि११ रोजी उदघाटन करण्यात आलेपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रारामकृष्ण मोरेप्रेक्षागृह चिंचवड येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार, विजय बोरुडे यांच्यासह एटॉस इंडियाचे प्रकल्प संचालक अविनाश पाटीलनॅसेंट प्रकल्प व्यवस्थापक डॉ. प्रशांत परसाई, केपीएमजी प्रकल्प व्यवस्थापक कल्पेश बोंडे, ‍सिताराम फुले आदी उपस्थित होते. प्रसंगी, व्हिडिओ चित्रफीतीद्वारे सदर प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.

या प्रकल्पाबाबत आयुक्त शेखर सिंह म्हणाले कीभारत सरकारच्या स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड मार्फत जीआयएस सक्षम ईआरपी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये ६ सॅप मॉड्यूल्स२५ नॉन-कोर आयटी ऍप्लिकेशन्सडॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टम आणि भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) चा समावेश आहे. याद्वारे नागरिकांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इत्यंभूत सेवा-सुविधांची माहिती व ठिकाणे नकाशावर एका क्लिकवर पाहता येणार आहेततसेचयाचा फायदा पिंपरी चिंचवडमधील नागरिकमनपा कर्मचारी यांनाच नव्हे तर आसपासच्या परिसरातील अभ्यांगतांना देखील होणार आहेपारदर्शक प्रशासन व नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी ही प्रणाली कार्यरत करण्यात आली आहेजिओपोर्टल सुविधा https://smartgisda.pcmcindia.gov.in/CitizenPortal/ या लिंकवर तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका वेबसाइटवर ( pcmcindia.gov.in ) “आपले शहर जाणून घ्या” आयकॉन अंतर्गत उपलब्ध आहे, यातून शहरातील लहान रस्त्यांची व ठिकाणांची माहिती नागरिकांना होणार आहे. सदर पोर्टल एटॉस इंडिया आणि नॅसेंट इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजीज यांनी विकसित केला आहेअसे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

 

सिटिझन जिओपोर्टलवर मनपा ठिकाणांची ‍मिळणार माहिती

·  आरोग्य सेवा (उदा. रुग्णालयांची ठिकाणे)

·  आपत्कालीन सेवा (उदा. फायर ब्रिगेड स्टेशन्सची ठिकाणे)

·  शैक्षणिक सुविधा (उदा.सरकारी शाळांची ठिकाणे)

·  क्रीडा सुविधा (उदा. PCMC क्रीडा सुविधा)

·  पर्यटन आणि प्रमुख ठिकाणे (उदा. PCMC गार्डन्स आणि स्मारके)

·  सामुदायिक सेवा (उदा. CFC कार्यालयांची ठिकाणेकम्युनिटी हॉल)

·  सरकारी कार्यालये (उदा. केंद्राची ठिकाणे, PCMC च्या झोन आणि वॉर्ड कार्यालयांसह राज्य कार्यालये)

·  वाहतूक (उदा. मेट्रो आणि बीआरटीएस थांब्यांची ठिकाणेरेल्वे स्थानके)


सिटिझन जिओ पोर्टलद्वारे मिळणार या सुविधा

·   दोन ठिकाणांमधील अंतरजागांचे क्षेत्रफळ मोजता येणार आहे.

·  पोर्टलवर पीसीएमसी सुविधा बुकिंग पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे ज्यावरून नागरिक क्रीडा मैदानबॅडमिंटन हॉल इत्यादी सुविधा बुक करू शकतात.

·   कोणत्याही स्थानाचा शोध घेवून लहान मार्गाची गणना करण्यासाठी नेव्हिगेशन सिस्टम तयार करण्यात आली आहे.

·  नागरिक निवडलेल्या नकाशाची प्रिंट घेऊ शकतात.

·  नागरिकांना जिओपोर्टलची कार्यप्रणाली समजण्यासाठी वापरकर्ता पुस्तिका देखील पोर्टलवर देण्यात आली आहे.

·  नागरिक मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये जिओपोर्टलवर माहिती पाहू शकतात.


या प्रकल्पाची प्रमुख वैशिष्टये: -

·        ३०० हून अधिक GIS स्तर आहेत.

·        LiDAR डेटा व सॅटेलाइट इमेज वापरून १२ लाख ५० हजार वैशिष्ट्ये GIS वर तयार करण्यात आले आहे.

·        २ लाख २० हजारहून अधिक बिल्डिंग फूटप्रिंट्स सॅटेलाईट इमेजवर डिजीटल मार्किंग करण्यात आली आहे.

·        ८ हजार हून अधिक लिनियर किमी रस्त्यांची नोंद (Marking) GIS वर डिजिटल करण्यात आली आहे.

·        ८७० हून अधिक लिनीअर किमी ड्रेनेज लाईनची GIS वर नोंद आहे.

·        ३५० हून अधिक लिनिअर किमी पाईपलाईनची GIS वर नोंद आहे.

·        १ लाख ४० हजार हून अधिक ड्रेनेज / चेंबरची नोंद करण्यात आली आहे.

·        ३८० हून अधिक पूल आणि उड्डाणपूलांची GIS वर नोंद झाली आहे.

·        ७० हजारहून अधिक पथदिवे नोंदविले गेले आहेत.

·        प्रभावी प्रशासन अंमलबजावणीसाठी शहराची ३६० दृश्ये GIS वर उपलब्ध आहेत.

 


 

जीआयएस सक्षम एकात्मिक ईआरपी प्रकल्प हा भारतातील पहिला प्रकल्प आहे. ज्या ठिकाणी महानगरपालिकेचे सर्व विभाग भौगोलिक माहिती प्रणालीसोबत इंटरप्रायजेस रिसोर्सेस प्लॅनिंग’ द्वारे एकत्रित केले आहेत. ज्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील विविध भू-स्थानिक माहितीचा सर्वात चांगल्या प्रकारे वापर करू शकेल. तसेचनागरिकांना कार्यक्षम आणि प्रभावीपणे सेवा प्रदान करण्यास मदत होणार आहे.”

 

-         शेखर सिंहआयुक्त- पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

नागरिकांना एका क्लिकवर मिळणार मनपा सुविधांची इत्यंभूत माहिती: - आयुक्त शेखर सिंह नागरिकांना एका क्लिकवर मिळणार मनपा सुविधांची इत्यंभूत माहिती: - आयुक्त शेखर सिंह Reviewed by ANN news network on १०/११/२०२३ ०५:५१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".