बँक ऑफ इंडियातर्फे आकर्षक वैशिष्ट्यांसह अद्ययावत बचत खाते

 



 

मुंबई : बँक ऑफ इंडिया या भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एका बँकेने सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी बचत खात्यामध्ये अद्ययावत सुधारणा केल्या आहेत. या ग्राहकांमध्ये कर्मचारी, घरगुती, नागरिक, तरुण यांचा समावेश आहे.

 

अद्ययावत बचत खात्यावर आता समूह वैयक्तिक अपघाती मृत्यू विमा कवच देण्यात आले आहे, जे १५० लाख रुपयांपर्यंत, हवाई अपघात विमा १०० लाख रुपयांपर्यंत, सोने आणि हिरे बचत खातेधारकांसाठी सवलतीतील लॉकर सुविधा, तर प्लॅटिनम बचत खातेधारकांसाठी मोफत, जागतिक स्वीकृतीसह आंतरराष्ट्रीय डेबिट कम एटीएम कार्ड, रिटेल कर्जावर सवलतीसह व्याजदर, रिटेल कर्जावर प्रक्रिया शुल्क माफ, क्रेडिट कार्डाचे मोफत वितरण, पीओएसवर उच्च वापर मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत आणि विविध एक्यूबीसह क्रेडिट कार्डाचे मोफत वितरण इत्यादी सुविधा दिल्या जाणार आहेत.

 

बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी – श्री. रजनीश कर्नाटक यांनी ९ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या झोनल व्यवस्थापकांच्या परिषदेत अद्ययावत बचत खाते लाँच केले. नवी, विविध वैशिष्ट्ये, सवलती आणि विमा कवचाने युक्त अद्ययावत बचत खात्यांच्या मदतीने खातेधारकांची संख्या वाढवण्यासाठी बँक सज्ज असल्याचे मीडिया व प्रेसला जाहीर करण्यात आले. ते पुढे म्हणाले, की बचत खातेधारकांना सामावून घेण्यासाठी बँकेचा ई- प्लॅटफॉर्म चांगली कामगिरी करत आहे आणि नवे बचत खाते संभाव्य ग्राहकांना आकर्षित करेल व पर्यायाने नव्या ग्राहकांचे डिजिटल ऑनबोर्डिंगचे प्रमाण वाढेल. बँकेचे कासा गुणोत्तर चांगले असून समाजातील सर्व स्तरांतील ग्राहकवर्ग विस्तारण्याच्या दिशेने पुढे जात आहे. आम्हाला खात्री आहे, की अद्ययावत बचत खाते आपली आकर्षक वैशिष्ट्ये, सवलती आणि विम्याच्या माध्यमातून ग्राहकांची बचत, त्यांचा सोयीस्करपणा तसेच संरक्षणाची योग्य काळजी घेईल.

 

ग्राहक, सर्वसामान्य नागरिक यांच्या बँकिंग आणि आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी बँक सातत्याने प्रयत्नशील असते. उत्पादने आणि प्रक्रियांमध्येही केलेल्या सुधारणांमुळे नवे बचत खातेधारक मिळवण्यासाठी बँकेला मदत होईल. या वैशिष्ट्यांचा सद्य आणि कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून ऑनबोर्डिंग करणाऱ्या नव्या ग्राहकांना लाभ घेता येईल.

बँक ऑफ इंडियातर्फे आकर्षक वैशिष्ट्यांसह अद्ययावत बचत खाते बँक ऑफ इंडियातर्फे आकर्षक वैशिष्ट्यांसह अद्ययावत बचत खाते Reviewed by ANN news network on १०/११/२०२३ ०५:४६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".