'ऑल इंडिया मुशायरा' मध्ये शेरोशायरीची बरसात!

 




पहले बारिश होती थी,तो आप याद आते थे

अब आप याद आते हो,तो बारिश होती है !


'डॉ.पी. इनामदार युनिव्हर्सिटी ' , 'डेक्कन मुस्लिम इन्स्टीट्यूट  '  कडून शानदार आयोजन

पुणे : माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या  'पुणे फेस्टिव्हल ' मध्ये २२  सप्टेंबर रोजी रात्री उर्दू ,हिंदी शेरो शायरीचा ' ऑल इंडिया मुशायरा ' आयोजित करण्यात आला होता.'डॉ.पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटी ' , डेक्कन मुस्लीम इन्स्टीट्यूट '  कडून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम गणेश कला क्रीडा केंद्र येथे उत्तरोत्तर रंगत गेला .

 'डेक्कन मुस्लीम इन्स्टीट्यूट' च्या शंभर वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. मुशायरा उदघाटन प्रसंगी शमा(मोठी मेणबत्ती) प्रज्वलित-रोशन करण्यात आली.अभय छाजेड,डॉ.पी. ए. इनामदार ,आबेदा   इनामदार ,कुलगुरू डॉ.एम.डी.लॉरेन्स, बाळासाहेब अमराळे,प्रा.इरफान शेख,शायर अंजुम बाराबंकवी (लखनौ)  , डॉ. लता हया (मुंबई) ,शाहिदा सय्यद उपस्थित होते.डॉ.उझ्मा तसनिम,इकबाल अन्सारी,डॉ.कासिम इमाम यांनी सूत्रसंचालन केले.डॉ.अजमत दलाल यांनी आभार मानले.  

पुणे फेस्टिव्हल मधील हा मुशायरा १९९२ पासून सुरु आहे आणि पुण्यातील गणेशोत्सवातील मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सहभाग या कार्यक्रमात असल्याने या मुशायऱ्याला दोन्ही समाजातील स्नेह आणि  सलोख्याचे प्रतीक मानले जाते. देशातील नामवंत शायर डॉ. लता हया (मुंबई), अंजुम बाराबंकवी (लखनौ), अबरार काशिफ (अकोला), सरदार सलीम (हैदराबाद), सागर त्रिपाठी (वाराणसी),डॉ.कासिम इमाम (मुंबई) फरहान दिल (मालेगाव), अब्दुल हमीद हुनर(इनामदार) आणि शाहनवाज काजी साहिल इत्यादिंनी शेरो शायरीचे बहारदार सादरीकरण केले. 

प्रारंभी डॉ.कासीम इमाम यांनी सुरुवात करताना पुण्यात सुरु असलेल्या रिमझिम पावसावर टिप्पणी केली.

 'पहले बारिश होती थी ,तो आप याद आते थे 

अब आप याद आते हो,तो बारिश होती है !'

 हा शेर पेश करून सर्वांच्या हृदयाची तार छेडली. 

'मुझे बारिशो से मोहब्बत नही थी ,

मोहब्बत ने आँखोंमे बारिश उतारी !'

असा शायरी अंदाज या मैफिलीत सुरु राहिला . 

'मुझे तुम भूल जाने में जरासी देर तो करते,

मुझे तुम याद आनेमे जरासी देर तो करते'

हा शेर सादर करून  शाहनवाज काजी साहिल यांनी आणखी रंग सुरुवातीलाच भरले . 

मुशायरा मधील गंगा-जमुना संस्कृतीला डॉ.लता हया यांनी उजाळा दिला. शेर पेश करताना त्या  म्हणाल्या ,

'मैं हिंदी की बेटी हूँ ,जिसे उर्दू ने पाला है ,

अगर हिंदी की रोटी है ,तो उर्दू का निवाला है 

कभी हिंदी पे बंदिश है ,कभी उर्दू पे ताला है' 

हाच धागा पुढे नेत  अब्रार काशिफ यांनी 

'मोहब्बत नाम ना रखूंगा,

महक  नाम ना रखूंगा,

अगर बेटी हुई ,

तो नाम उर्दू रखूंगा' 

असे सांगत आपले उर्दू प्रेम प्रकट केले. भोवतालच्या परिस्थितीवर मार्मिक टिपणी करताना डॉ.कासीम म्हणाले

'आँधी  लाना   हमारे बस में नही ,

लेकिन चराग जलाना इख्तियार में है  !'

मालेगाववरुन आलेले फरहान दिल म्हणाले,

'ये उनसे  पुछीये ,जो कामयाब होते है 

जहाँ जहाँ वफाई  जादा करता हू ,

वहा वहा ,मेरे ताल्लुक खराब होते है '

स्त्री शक्तीला संबोधित करताना,नारी वंदन करताना पं .सागर त्रिपाठी (वाराणसी) म्हणाले,'

मेरी इबादत ,अर्चना ,पूजा बडी मन्नत से आती है ,

खुदा के फझल से बेटीया ,जन्नत से आती है 

अबरार काशिफ (अकोला)  वेगळा अंदाज पेश करताना म्हणाले,'

दर्दे  मोहब्बत ,दर्दे जुदाई .. 

दोनो को एक साथ मिला ,

तू भी तनहा, मै  भी तनहा   

आ ! इस बात पे हात  मिला !

समारोप करताना अंजुम बाराबंकवी (लखनौ) यांनी  मैफिलीवर कळसाध्याय चढवला. समाजप्रवृत्तींवर बोट ठेवताना  ते म्हणाले

'जब चमकने लगा किस्मत का तारा मेरा 

खुद बेखुद लोग बने सहारा मेरा ! 

पुणे आणि राज्यातून आलेले रसिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

'ऑल इंडिया मुशायरा' मध्ये शेरोशायरीची बरसात! 'ऑल इंडिया मुशायरा' मध्ये शेरोशायरीची बरसात! Reviewed by ANN news network on ९/२३/२०२३ ०१:३६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".