सेंट ॲन्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सलग ३१ वर्षांपासून आयोजन
पिंपरी : सेंट ॲन्स एज्युकेशन सोसायटी त्रिवेणीनगर, तळवडे यांच्या वतीने वायएमसीए यांच्या मान्यतेने व पीडीएएए पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि. १७ सप्टेंबर) छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल, बालेवाडी येथे सकाळी ८.३० ते ५.३० या वेळेत ३१ व्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सेंट ॲन्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सी. जे. फ्रान्सिस यांनी दिली.
संस्था मागील तीस वर्षांपासून जलतरण स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करत आहे. जलतरणपटूंचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून राज्यातून जलतरणपटू स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येत असतात असे फ्रान्सिस यांनी सांगितले.
सहा वर्षांखालील मुले/मुली - ५० मीटर बेस्ट स्ट्रोक फ्री स्टाईल बॅक स्ट्रोक, आठ वर्षांखालील मुले मुली बेस्ट स्ट्रोक, बॅकस्ट्रोक,फ्रीस्टाइल बटरफ्लाय, दहा वर्षांखालील मुले मुली बेस्ट स्ट्रोक, बॅक स्ट्रोक, फ्रीस्टाइल बटरफ्लाय, बारा वर्षांखालील मुले/मुली शंभर मीटर बेस्ट स्ट्रोक, बॅकस्ट्रोक, फ्रीस्टाइल बटरफ्लाय २०० मीटर तसेच १४ वर्षांखालील शंभर मीटर बेस्ट स्ट्रोक, बॅक स्ट्रोक, फ्री स्टाईल बटरफ्लाय २०० मीटर, सोळा वर्षाखालील शंभर मीटर बेस्ट स्ट्रोक, बॅकस्ट्रोक, फ्री स्टाईल बटरफ्लाय २०० मीटर; खुला गट १०० मीटर बेस्ट स्ट्रोक, बॅकस्ट्रोक, फ्रीस्टाइल; २०० मीटर बटरफ्लाय अशा प्रकारांमध्ये ही स्पर्धा घेतली जाणार आहे अशी माहिती सी. जे. फ्रान्सिस यांनी दिली. इच्छुक स्पर्धकांनी बालेवाडी येथे स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित रहावे. जास्तीत जास्त जलतरणपटूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन सेंट अँड एज्युकेशन सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.
रविवारी बालेवाडीत राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा
Reviewed by ANN news network
on
९/१५/२०२३ ०९:३९:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
९/१५/२०२३ ०९:३९:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: