पिंपरी : किरकोळ कारणावरून मित्राचा खून करणा-या एका परप्रांतियाला रावेत पोलिसांनी जेरबंद केले आहे.
दिनेश रामविलास यादव वय २१ वर्षे असे या आरोपीचे नाव आहे. तो किवळे मुकाई चौकाजवळ निर्माण ग्रुपच्या साईवर पञ्याच्या शेडमध्ये र्हात होता, तो मूळचा बिरैची कला, पोस्ट-खंबा ता. रिघवली, जि. बस्ती, राज्य उत्तरप्रदेश येथील आहे.
आरोपीने ४ सप्टेंबर रोजी त्याचा सहकारी मित्र, कामगार विवेक गणेश पासवान याला किरकोळ कारणावरून तोंडावर सिंमेटची वीट ३ ते ४ वेळा मारुन ठार मारले होते. आणि तो पसार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत असताना त्यांना आरोपी देहूरोड येथील सेंट्रलचौकातून एका टेम्पोमध्ये बसून मुंबईच्या दिशेने गेल्याचे सीसीटीव्ही फ़ुटेजवरून दिसून आले होते.
तपास सुरू असताना सहायक पोलीस निरीक्षक पी. आर. शिकलगार यांना आरोपी शिवाजी चौक कल्याण येथे असल्याची माहिती मिळाली. रावेत पोलीस स्टेशनचे पथक कल्याण येथे गेले आणि, त्यांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक पी आर शिकलगार, विशाल जाधव, उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे, हवालदार कोळगे, गायकवाड, शिपाई नंदलाल राऊन, रमेश तांबे, संतोष तांबे, विजयकुमार वाकडे, रमेश ब्राम्हण, संतोष धवडे व महिला नाईक धाकडे यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
९/१५/२०२३ ११:२०:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: