विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासह व्यावहारिक ज्ञानावर भर द्यावा : आयुक्त शेखर सिंह

 


आकुर्डी येथील केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत आयुक्तांनी साधला संवाद

पिंपरी : दिवसेंदिवस शिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडत आहेत. सर्वत्र स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत ‍टिकण्यासाठी कौशल्ययुक्त ज्ञानाची गरज भासू लागली असून विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासह व्यावहारिक ज्ञानावर भर देणे आवश्यक आहे, असे मत पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले. आकुर्डी येथील केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये “विद्यार्थ्यांशी संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना आयुक्त बोलत होते. यावेळी, विशेष अधिकारी किरण गायकवाड, शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय वरणेकरसचिव ज्ञानेश्वर काळभोरप्राचार्या सरबजीत कौर महलपरीक्षित कुंभार यांच्यासह  शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.  

विद्यार्थी जिवन हसत खेळत आणि तणावमुक्त जगा. मोठया स्पर्धांमध्ये सहभाग घ्या. आत्मविश्वास वाढवून सकारात्मक गोष्टींचा विचार करायला हवा. मित्र चांगले बनवून अभ्यासाची प्रक्रीया समजून घेत निरंतर असू द्या, कठोर मेहनत, प्रामाणिकपणा, निरंतर प्रयत्न या त्रिसुत्रीतूनच यश प्राप्ती होत असते. विद्यार्थी दशेत सोशल मिडीयाचा वापर टाळणे हितावह आहे. आपले शालेय जिवन आनंदाने व्यतीत केले पाहिजे, आणि त्यातून आयुष्य चांगल्या पध्दतीने घडविण्याचा पाया रचला पाहिजे. स्वत:वर विषय लादून न घेता आपल्या आवडत्या विषयात करियची संधी शोधायला हवी, असा सल्ला देखील आयुक्त शेखर सिंह यांनी विद्यार्थ्यांना दिला. तसेच, विद्यार्थी दशेपासून ते आजपर्यंतचा व्यक्तीगत अनुभव सुध्दा त्यांनी कथन केला.

राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात होवून मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडला. तसेच, विविध स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्कूलच्या प्राचार्या सरबजीत कौर महल यांनी स्कूलमध्ये सूरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थी व विद्यार्थीनींनी नृत्य सादरीकरण आणि गीत गायनाने सर्वांचे लक्ष वेधले.

यादरम्यान, आयुक्त शेखर सिंह यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण केले. विद्यार्थी जिवनात घ्यावयाची काळजी, तणावमुक्त अभ्यास, परिक्षांना सामोरे जातांना करावयाचे नियोजन, चांद्रयान -3, स्मार्ट सिटी मिशन, शहर विकासाची आव्हाने आणि नियोजन, वाहतुक व्यवस्था व आव्हाने, शिक्षणाच्या संधी, करियर क्षेत्र निवडताना घ्यावयाची काळजी, महापालिका प्रशासनाद्वारे सुरु असलेले कार्य, स्वच्छता अभियान, शहराची सुरक्षा, स्पर्धा परिक्षा अभ्यास, आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची आयुक्त सिंह यांनी उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रिया मलिक यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन स्मार्ट सारथी टीमच्या वतीने करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासह व्यावहारिक ज्ञानावर भर द्यावा : आयुक्त शेखर सिंह विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासह व्यावहारिक ज्ञानावर भर द्यावा : आयुक्त शेखर सिंह Reviewed by ANN news network on ९/१५/२०२३ ०९:३६:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".