श्री सिद्धीविनायक सेवा मंदीरात अथर्वशीर्ष पठण

 


बाबू डिसोजा, कुमठेकर
निगडी,प्राधिकरण : १ सप्टेंबर २०२३ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळांतर्गत, संस्कृती संवर्धन व विकास महासंघ यांच्या वतीने, प्राधिकरणातील श्री सिद्धी विनायक सेवा मंडळाच्या गणेश मंडपात सकाळी 'श्री गणेश उत्सवा' निमित्त सामुदायिक अथर्वशीर्ष पठण आयोजित केले होते. ॐ नमस्ते गणपते नमः त्वमेव प्रत्यक्षं तत्व मसि,त्वमेव कर्तासि, असे अथर्वशीर्षाचे सामूहीक स्वर, प्रतिभा निफाडकर यांनी केलेला शंखनाद आणि मोरया मोरया जयघोषात ज्ञानप्रबोधीनीचे विद्यार्थी,महिला व पुरुषांनी अथर्वशीर्ष पठण केले.
सकाळच्या मंगल  प्रहरी श्री सिध्दीविनायका समोर मंत्रोच्चारानी, श्री गणेशाचा जयघोषाने सर्व वातावरण मंगलमय झाले होते.या प्रसन्नतेची अनुभूती,  उपस्थित गणेश भक्तांना मिळाली.
 कार्यक्रमास किसन महाराज चौधरी, डॉ अजित जगताप, शिवानंद चौगुले, महिला भजन महासंघाच्या माधुरी ओक, ज्योती कानेटकर, प्राधिकरण विभाग प्रमुख चंद्रशेखर जोशी, ज्ञान प्रबोधिनीचे सुधीर कुलकर्णी या मान्यवरांनी हजेरी लावली होती. कार्यक्रम  यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सेवा hundred दिलीप देशपांडे, मुकुंद साठे  , करंबेळकर व कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले .
श्री सिद्धीविनायक सेवा मंदीरात अथर्वशीर्ष पठण श्री सिद्धीविनायक सेवा मंदीरात अथर्वशीर्ष पठण Reviewed by ANN news network on ९/२१/२०२३ ०१:१९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".