संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयगाव येथे नव मतदार नोंदणी जनजागृती कार्यक्रम
दिलीप शिंदे
सोयगाव : मतदान हा आपला सार्वभौम हक्क आहे, आपण केवळ वैयक्तिक भूमिकेतून या अधिकाराकडे न पाहता देशाच्या सर्वसमावेशक विकासाच्या भूमिकेतून या अधिकाराकडे पहावे. मतदार होणे म्हणजे सार्वजनिक निर्णय प्रक्रियेत अप्रत्यक्षरित्या सहभागी होणे होय, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. असे मत संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक श्रीकृष्ण परिहार यांनी मांडले. ते राष्ट्रीय सेवा योजना विभाग व तहसील कार्यालय सोयगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नव मतदार जनजागृती कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमासाठी सोयगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार श्री हेमंत तायडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पवार हे अध्यक्षस्थानी होते.
या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे, डॉ दिलीप बिरुटे, डॉ भास्कर टेकाळे, डॉ लक्ष्मीनारायण कुरूपटवार डॉ संतोष पडघन, डॉ रामेश्वर मगर, डॉ सुनील चौधरे, डॉ पंकज गावित, प्रा भरती पाटील, प्रा स्वाती चव्हाण, प्रा सौरभ सुरसे, श्री सचिन ओव्हळ आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रदीप गोल्हारे यांनी केले तर आभार डॉ निलेश गावडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
९/०१/२०२३ ०६:०३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: