तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ..
दिलीप शिंदे
सोयगाव : सोयगाव तहसील कार्यालयाची सुरक्षा राम भरोसे असल्याने तहसील कार्यालयाच्या आवारात उभे असलेल्या ट्रॅक्टरची बॅटरी चोरी गेल्याची चर्चा दि.०१ शुक्रवारी तहसील कार्यालयात सुरू असल्याने सोयगावात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करीत असतांना एम एच१८- ७१८३ व एम एच २८ डी ३७४४ या दोन ट्रॅक्टर सह इतर एक ट्रॅक्टर अशा तीन ट्रक्टरांवर महसूल अधिकाऱ्यांनी कारवाई करीत तिन्ही ट्रॅक्टर तहसील कार्यालय परिसरात जमा करण्यात आले होते. या ट्रॅक्टरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही तहसील कार्यालयाची आहे. तीन ट्रॅक्टर पैकी एकाने दंड भरला असून दंड भरलेले ट्रॅक्टर (दि.३०) बुधवारी सोडण्यात आले. या ट्रॅक्टरची बॅटरी सुद्धा चोरीला गेलेली असून या बाबत देखील तहसील कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली नव्हती. दि.०५ मार्च रोजी तहसील कार्यालयात जमा करण्यात आलेल्या एम एच १८ ७१८३ या ट्रॅक्टरची बॅटरी (दि.३०) बुधवारी चोरी गेल्याची चर्चा तहसील कार्यालय परिसरात सुरू होती. मात्र तहसील कार्यालयाकडून (दि.०१ ) शुक्रवारी सायंकाळ पर्यंत बॅटरी चोरी संदर्भात कोणतीही तक्रार सोयगाव पोलीस ठाण्यात दिली नसल्याने तहसील कार्यालयात आलबेल असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. तहसील कार्यालयाच्या परिसरात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरची बॅटरी चोरी जाण्याची ही दुसरी घटना असल्याने शासकीय कार्यालयचं सुरक्षित नसल्याने शासकीय मालमत्तेच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून यास जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.तहसीलदार मोहनलाल हरणे याप्रकरणात काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Reviewed by ANN news network
on
९/०१/२०२३ ०६:००:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: