पुणे : जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात काल मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले असून काही जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. खासदार संभाजीराजे, उदयनराजे भोसले आणि शरद पवार आज जालन्यात पोहोचणार आहेत. या पार्श्वभूमिवर पुणे शहरात शांतताभंगाच्या घटना घडण्याची शक्यता पोलिसांना वाटत आहे. ्त्यामुळे पोलिसांचे टेन्शन वाढले असून शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
या घटनेचा तात्काळ खुलासा करावा अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली असून उदयनराजेही संतापले आहेत. त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. शरद पवार याणीही लाठीहल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. हे थांबवलं नाही, तर मला त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांना धीर द्यावा लागेल असे म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर पुण्यात सार्वजनिक शांतताभंगाच्या घटना घडू नयेत म्हणून शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
Reviewed by ANN news network
on
९/०२/२०२३ ११:३८:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: