सिमला : हिमाचलप्रदेशात पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून मोठ्या प्रमाणावर जीवीतहानी झाली असण्याची भिती व्यक्त केली जात आहे. मंडीमध्ये ढगफ़ुटी झाली यामुळे बससारखी मोठी वाहने वाहून गेली आहेत. डेहराडून येथील डिफ़ेन्स महाविद्यालयाची इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आहे. सिमल्यामध्ये पावसाचे तांडव धडकी भरवणारे आहे. हृषिकेश येथे ४१९ मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून या मुळे २०१३ साली झालेल्या प्रलयाच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.
हिमाचल प्रदेशात ऑरेंज अलर्ट असताना गेल्या ४८ तासांपासून मुसळधार पावसाने कहर केला आहे. ठिकठिकाणी दरड कोसळण्याबरोबरच झाडे पडल्याने रस्ते ठप्प झाले आहेत. राज्यातील ४५२ रस्त्यांवर वाहनांची वाहतूक ठप्प झाली आहे. २४ जून ते १३ऑगस्ट या पावसाळ्यात २५७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २९० जण जखमी झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ३७६ घरे कोसळली आहेत.
Reviewed by ANN news network
on
८/१४/२०२३ ०४:०४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: