पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विविध पदकांची घोषणा करण्यात आली. यामध्ये चौबे यांची निवड करण्यात आली आहे.
यंदा केंद्रीय राखीव पोलीस दलातील एकाला शौर्यसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. देशातील २२९ जणांना शौर्यसाठी पोलीस पदक देण्यात आले, त्यात महाराष्ट्रातील ३३ जणांचा समावेश आहे. तर ६४२ जणांना गुणवंत सेवेसाठी पोलीस पदक प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ४० जणांचा समावेश आहे.
देशभरातील ८२ जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांचा यामध्ये समावेश आहे.
Reviewed by ANN news network
on
८/१४/२०२३ ०६:१५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: