तळोजा औद्योगिक वसाहतीतील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनविकारांचा त्रास; शिवसेनेने अधिका-यांना धरले धारेवर! (VIDEO)

 


पनवेल : तळोजा औद्योगिक क्षेत्रामधून सुरू असलेल्या वायू उत्सर्जनामुळे तळोजा, कळंबोली, पनवेल परिसरातील हवा प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे परिसरात ताप, खोकला आणि श्वसनविकाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या प्रकारामुळे शिवसेनेच्या पदाधिका-यांनी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या अधिका-यांची बेलापूर येथील कार्यालयात भेट घेऊन त्यांना धारेवर धरले. एका आठवड्यात या प्रकरणी कारवाई न झाल्यास कंपन्यांवर मोर्चा काढला जाईल असा इशारा शिवसेनेच्या पदाधिका-यांनी दिला आहे.

महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख  रामदास शेवाळे,महानगर संघटक मंगेश रानवडे, शहर संघटक इम्तियाज शेख, विभाग संघटिका ज्योती नाडकर्णी, विभाग प्रमुख मुनाफ शेख व झोयेब शेख, शाखाप्रमुख फैयाज नगाणी यांचा समावेश होता.

यासंदर्भात बोलताना महानगर संघटक मंगेश रानवडे म्हणाले, तळोजा औद्योगिक क्षेत्रामधून सध्या प्रदूषणाचे प्रमाण वाढत असल्याचे आढळले आहे. प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रात चर्चा आहे.

 पनवेलमधील शिवसेनेने केलेल्या एका निरीक्षणामार्फत असे आढळून आलेले आहे की, तळोजा एमआयडीसीच्या लगत असलेल्या सर्व परिसरामध्ये व्हायरल केसेसचे प्रमाण  झपाट्याने वाढत आहे. प्रदीर्घ खोकला ताप, डोके दुखणे अशा विविध तक्रारी घेऊन नागरिक डॉक्टरांकडे धाव घेत आहेत.

 तज्ञांकडून चौकशी केल्यास असे निदर्शनास आले की या आजारांचा आणि प्रदूषण याचा थेट संबंध असून, शिवसेना पनवेल पक्षाने तळोजा एमआयडीसी मधील परिसराचा पूर्ण सर्व्हे  केला.

तळोजा व कळंबोली येथील हवा गुणवत्ता निरीक्षण युनिटच्या माध्यमातून उपलब्ध असलेले प्रदूषणाचे आकडे अत्यंत धक्कादायक आहेत. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या अधिका-यांशी चर्चा केली असून आठवडाभरात परिस्थितीत सुधारणा न झाल्यास मोर्चा काढण्याचा इशारा  विभागीय अधिकारी  सतीश पडवळ व तळोजा विभागाचे अधिकारी  विक्रांत भालेराव यांना  दिला आहे.


तळोजा औद्योगिक वसाहतीतील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनविकारांचा त्रास; शिवसेनेने अधिका-यांना धरले धारेवर! (VIDEO) तळोजा औद्योगिक वसाहतीतील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना  श्वसनविकारांचा त्रास;  शिवसेनेने अधिका-यांना धरले धारेवर! (VIDEO) Reviewed by ANN news network on ८/१९/२०२३ ११:४४:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".