पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील मौजे शिरगाव तालुका मावळ जिल्हा पुणे येथे असलेल्या अभिमान सोसायटी समोर शिरगाव परंदवडी पोलिसांनी दिनांक १७ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मेफ़ेंटरमाईन सल्फ़ेट इन्जेक्शन आणि गांजा विकणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून मेफ़ेंटरमाईन सल्फ़ेट इन्जेक्शनच्या १४५ पॅकबंद बाटल्या आणि ५५ ग्रॅम गांजा, एक सुरा, दोन मोटारसायकली, ४ हजार रुपये असा एकूण २ लाख २१ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सुमित गणेश पिल्ले, वय ३२ वर्षे, सध्या राहणार कृष्णा कॉलनी, साईेनिवास, काका पेट्रोलपंपाजवळ, साने चौक, चिखली, पुणे, मूळ राहणार फ्लॅट नंबर २०३, सोनिगरा पर्ल, दांगटवस्तीमागे, विकासनगर, देहुरोड, चैतन्य उमेश कुऱ्हाडे, वय २१ वर्षे, राहणार फ्लॅट नंबर एस ५, नवरत्न सोसायटी, डिमार्ट जवळ, विकासनगर, किवळे, देहुरोड, पुणे अशी आरोपींची नावे आहेत.
त्यांच्या विरोधात शिरगाव परंदवडी पोलीसठाण्यात भारतीय दंडविधान कलम २७६, ३३६, ३२८ व अमलीपदार्थ विरोधी कायदा कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) सह भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी अमलीपदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे सापळा रचून त्यांना अटक केली.
ही कारवाई शिरगाव परंदवडी पोलिसठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ, हवालदार टी. सी. साबळे, नाईक एस. बी. घाडगे, वाय. जे. नागरगोजे, अंमलदार एस. एल. फडतरे व डी व्ही राठोड यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
८/१८/२०२३ १०:२०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: