पुणे : भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांसाठी 'एनएसएस अवेअरनेस प्रोग्राम' अंतर्गत ' पंचप्राण समारंभ' आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने कार्यरत राहण्याची शपथ घेतली.
भारती विद्यापीठ विधी विद्याशाखेच्या अधिष्ठाता आणि न्यू कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य डॉ.उज्वला बेंडाळे यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली . यावेळी उपप्राचार्य डॉ.ज्योती धर्म,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी सलील शृंगारपुरे, शुभम त्रिपाठी, डॉ. विद्या ढेरे उपस्थित होते. 'मेरी माती, मेरा देश' या उपक्रमांतर्गत एनएसएस स्वयंसेवकांनी खानापूर गावामध्ये वृक्षारोपण केले आणि वनीकरणाबाबत जागृती केली.
भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजमध्ये 'एनएसएस अवेअरनेस प्रोग्राम'
Reviewed by ANN news network
on
८/१९/२०२३ १२:३७:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
८/१९/२०२३ १२:३७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: