पश्चिम बंगाल : पश्चिम बंगाल मधील दत्तपुकुर येथे बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फ़ोट झाला आहे. या स्फ़ोटात किमान ५ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. बचावकार्य सुरू असून जखमींना उपचारासाठी बारासात रुग्णालयात नेण्यात येत आहे. परिसरातील अनेक घरांना यामुळे हादरा बसला असून भिंतींना भेगा पडल्या आहेत. बचावकार्य आणि तपास सुरू असल्याचे दत्तपुकुर पोलीस सूत्रांनी सांगितले.
बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फ़ोट; किमान ५ व्यक्तींचा मृत्यू! (VIDEO)
Reviewed by ANN news network
on
८/२७/२०२३ ०१:५५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: