सोमवारी बालेवाडी येथे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा

 


पुणे : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्याचे शिवछत्रपती क्रीडा संकुल (बॅडमिंटन हॉल), महाळुंगे, बालेवाडी येथे सोमवार २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन,  क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आदी उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्यावतीने सन २०१९-२०, सन २०२०- २१ व सन २०२१-२२ या वर्षासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, खेळाडू पुरस्कार, एकलव्य खेळाडू पुरस्कार (दिव्यांग खेळाडू), साहसी क्रीडा पुरस्कार व जिजामाता पुरस्कार शासनाने जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

 कार्यक्रमास क्रीडा प्रेमी, खेळाडू, विद्यार्थी, विविध खेळाचे जिल्हा व राज्य संघटना प्रतिनिधी, माजी क्रीडा पुरस्कारार्थी (राज्य व केंद्र शासनाचे), विविध खेळांच्या अॅकेडमीचे खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संस्था, पत्रकार, पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल आणि क्रीडा व युवक सेवा आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

 पुरस्कारार्थींची नावे पुढीलप्रमाणे







सोमवारी बालेवाडी येथे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी बालेवाडी येथे  शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा Reviewed by ANN news network on ८/२७/२०२३ ०३:२२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".