पुणे : कोंढवा परिसरात एका तरुणीने अल्पवयीन मुलाला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकारामुळे त्रासलेल्या त्या मुलाने पोलिसठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्या तरुणीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोस्को) कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोंढवा परिसरात एक २८ वर्षांची तरुणी आणि अल्पवयीन मुलगा यांची कुटुंबे शेजारी राहतात. आरोपी तरुणीने मुलाला माझ्याशी संबंध ठेव नाहीतर तू माझ्यावर बलात्कार केला, अशी तक्रार पोलिसात देईन, अशी धमकी दिली. त्यानंतर तिने वेळोवेळी अल्पवयीन मुलाला धमकावले आणि जबरदस्तीने त्याच्याशी शारीरिक संबंध जोडले. एवढ्यावरच न थांबता, या प्रकाराचे मोबाइल कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यास संबंधित अल्पवयीन मुलाला भाग पाडले.
या सततच्या त्रासाला कंटाळून त्या मुलाने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्या तरुणीविरोधात पोस्को कायद्याखाली गुन्हा दाखल केला, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बाबर करत आहेत.
Reviewed by ANN news network
on
८/२१/२०२३ ११:४६:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: